हे आहे जगातलं सर्वात महागडं कलिंगड, फक्त लिलावातच लागते यावर लाखो रूपयांची बोली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 17:35 IST
1 / 9जगभरात वेगवेगळ्या प्रजातींची फळं असतात ज्यांच्या किंमतीही वेगवेगळ्या असतात. उन्हाळ्यात काही खास फळांची मागणी वाढते. भारतासह संपूर्ण जगात अनेक प्रकारची फळं आणि भाज्या मिळतात. भारतात सामान्यपणे फळांची किंमत ४०० ते ५०० रूपये किलो दरम्यान असते. उन्हाळ्यात आंबे, लीची, खरबूज आणि कलिंगडाची मागणी जास्त वाढे. कलिंगड सामान्यपणे १०० ते २०० रूपयात मिळतं. पण एक असंही कलिंगड आहे ज्याची किंमत लाखो रूपये असते. सामान्य माणूस हे कलिंगड विकत घेण्याचा विचारही करू शकत नाही.2 / 9उन्हाळ्यात कलिंगड खाणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. उन्हाळ्यात मागणीनुसार कलिंगडाची किंमत घटते किंवा वाढते. पण आम्ही तुम्हाला ज्या कलिंगडाबाबत सांगणार आहोत त्याचा लिलाव होतो आणि याला सगळेच विकत घेऊ शकत नाहीत. 3 / 9हे अनोखं कलिंगड जपानमध्ये मिळतं. ज्याला जगातील सर्वात महागडं कलिंगड मानलं जातं. डेनसुक प्रजातीच्या या कलिंगडाला लोक काळं कलिंगड असंही म्हणतात. हे केवळ जपानच्य होकाइडो आयलॅंडच्या उत्तर भागात आढळतं. या दुर्मीळ कलिंगडाचं उत्पादन फार कमी होतं.4 / 9सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे डेनसुक प्रजातीचं कलिंगडाचं एका वर्षात केवळ १०० नगाचच उत्पादन होतं. त्यामुळे फळांच्या बाजारात ते क्वचितच मिळतं.5 / 9डेनसुक प्रजातीचं हे कलिंगड इतकं खास असतं की, दरवर्षी यांचा लिलाव होतो आणि हे दुकानांवर विकले जात नाहीत. या कलिंगडावर मोठमोठ्या बोली लागतात आणि यांची किंमत लाखो रूपयांमध्ये असते.6 / 9या प्रजातीच्या कलिंगडाला २०१९ मधील लिलावात ४.५ लाख रूपयांची बोली लागली होती. आता सर्वच गोष्टींप्रमाणे कोरोनाचा फटका या कलिंगडांनाही बसला आहे. ज्यामुळे त्यांची किंमत खाली आली आहे.7 / 9कोरोना महामारी दरम्यान गेल्या दोन वर्षात या कलिंगडाच्या किंमती मोठी घट झालेली असतानाही हे कलिंगड जगातील सर्वात महागडं कलिंगड आणि दुर्मीळ कलिंगड आहे. 8 / 9हे कलिंगड बाहेरून चमकदार आणि काळं दिसतं. आणि आतून गर्द लाल रंगाचं असतं. इतर कलिंगडापेक्षा हे कलिंगड अधिक गोड आणि जास्त टेस्टी असतं. तसेच यात बियांचं प्रमाणही फार कमी असतं. 9 / 9असंही सांगितलं की, या दुर्मीळ प्रजातीचं प्रत्येक कलिंगड महागडं विकलं जात नाही. केवळ पहिल्या पिकातीलच कलिंगड इतकं महागडं असतं. त्यानंतर आलेले कलिंगड हे १९ हजार रूपयांपर्यंत विकले जातात. पण तरीही हे कलिंगड इतर कलिंगडाच्या तुलनेत अनेक पटीने महागच असतं.