शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

चुकून फॅमिली ग्रुपमध्ये पाठविला न्यूड फोटो अन्...; महिलेने शेअर केली कुटुंबीयांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 11:18 IST

1 / 8
टिकटॉक युजरने आपल्या फॉलोअर्ससोबत एक खासगी गोष्ट शेअर केली आहे. बेथनी मार्गेरेट नावाच्या एका महिलेने टिकटॉकवर सांगितले आहे की, तिने चुकून आपल्या फॅलिमी ग्रुपच्या व्हॉट्सअॅप चॅटवर तिचे न्यूड फोटो कसे पाठवले, त्यानंतर तिच्या भावाने तिला लगेच मेसेज केला होता.
2 / 8
बेथ तिच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगते की, ती तिच्या मित्राबरोबर खरेदी करण्यासाठी गेली होती आणि दोघांनाही एक ब्रालेट आवडत होता. यानंतर, दोघांनी बेथच्या घरी थांबण्याची योजना आखली होती, जेणेकरून ते घरी जाऊन आपल्या खरेदीच्या कपड्यांचे फिटिंग तपासू शकतील.
3 / 8
दरम्यान, बेथच्या मित्राला घरी काही काम होते, यामुळे त्याने बेथच्या घरी जाण्याचा प्लॅन रद्द केला. त्यानंतर बेथने त्याला सांगितले, शॉपिंग कपड्यांचे फिटिंग कसे आहे ते पाहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर एक फोटो पाठवते.
4 / 8
बेथ पुढे म्हणाली की, या ब्रालेटच्या फिटिंगमुळे मला खूप आनंद झाला. यानंतर, माझ्या मित्राने एक फोटो पाठवण्यास सांगितले. मी फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत बोलतो आणि कधीकधी माझ्या फॅमिलीसोबत बोलते. त्यामुळे मी अलीकडील चॅटवर कोणताही विचार न करता थेट फोटो पाठविला.
5 / 8
यानंतर बेथ कपडे बदलण्यासाठी गेली. पण जेव्हा त्याला नोटिफिकेशन आले, तेव्हा बेथच्या पायाखालची जमीन सरकली. तिने चुकून फोटो तिच्या मित्राऐवजी फॅमिली ग्रुपमध्ये पाठविला होता. दरम्यान, बेथच्या भावाने लगेच तिला मेसेज करून त्यांचा फोटो डिलीट करण्यास सांगितले.
6 / 8
बेथला तिची चूक समजताच तिने लगेच न्यूड फोटो हटविला. बेथने फोटो पाठविला तेव्हा तिचे वडील झोपी गेले होते, परंतु बेथने पहाटे उठून आपल्या वडिलांना सर्व काही समजावून सांगितले.
7 / 8
मात्र, हा न्यूड फोटो डिलीट करण्यापूर्वी तिच्या कुटुंबातील काहींनी पाहिले होता म्हणून बेथला खूपच लाज वाटली. बेथच्या कुटुंबीयांनी मात्र या फोटोबद्दल काहीच गोंधळ उडाला नाही आणि यातील बहुतेक सदस्य तिला समजविण्याचा प्रयत्न करीत होते.
8 / 8
बेथची वहिनी म्हणाली की असे फोटो पाठवण्यापूर्वी आपण नेहमीच चांगले तपासले पाहिजे. दरम्यान, आतापर्यंत लाखो लोकांनी बेथचा हा व्हिडिओ पाहिला आहे आणि त्यापैकी बहुतेकजण बेथच्या कुटुंबाचे कौतुक करीत आहेत कारण तिच्या कुटुंबाची प्रतिक्रिया खूपच सकारात्मक होती.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया