बाबो! झोपेत तोंडातून निघाला एक शब्द आणि दगा देणाऱ्या बॉयफ्रेन्डचा झाला भांडाफोड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:28 IST
1 / 82 / 8अमेरिकेच्या Arizona मध्ये राहणाऱ्या टिकटॉक यूजर बेली हंटरने व्हिडीओ क्लीप शेअऱ करत सांगितलं की, कशाप्रकारे तिने तिच्या बॉयफ्रेन्डचं पितळ उघडं पाडलं. तिने सांगितलं की, पहिल्यांदा तिला तेव्हा संशय आला, जेव्हा तो झोपेत काहीतरी बडबड करत होता. पण तेव्हा तिला तो काय म्हणतोय हे समजलं नव्हतं.3 / 8बेलीने सांगितलं की, जेव्हा ती बॉयफ्रेन्डच्या जवळ गेली आणि लक्ष देऊन ऐकलं तेव्हा लक्षात आलं की, तो एका महिलेचं नाव घेत आहे. हे अजब होतं. पण अशाप्रकारे एका महिलेचं नाव घेणं तिला काही समजत नव्हतं.4 / 8तिने सांगितलं की, रात्री ती बेडवरून उठली आणि त्या महिलेचं नाव फेसबुकवर सर्च करू लागली होती. तेव्हा तिला आढळलं की बॉयफ्रेन्ड ज्या महिलेचं नाव घेत आहे ती महिला विवाहित आहे आणि तिला मुलंही आहेत. जेव्हा बॉयफ्रेन्ड सकाळी झोपेतून उठला तर तिने त्याला याबाबत विचारले.5 / 8मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, बॉयफ्रेन्डने महिलेचं नाव ऐकताच सांगितलं की, ती हायस्कूलमध्ये त्याच्यासोबत शिकत होती. त्यामुळे तो तिला ओळखतो. यापेक्षा जास्त त्यांच्यात काही नाही. बेलीचा बॉयफ्रेन्डच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता आणि त्यानंतर तिने त्याच्याबाबत माहिती काढणं सुरू केलं.6 / 8बेलीने त्या महिलेला फोनवर मेसेज पाठवून विचारले की, ती बॉयफ्रेन्डसोबत बोलली होती का? यावर महिलेने दिलेल्या उत्तराने बेली बुचकळ्यात पडली. ती महिला बेलीला म्हणाली की, तिने त्याच्या कामाशी काम ठेवावं.7 / 8त्यानंतर बेलीने बॉयफ्रेन्डचे कॉल डिटेल्स पाहिले, त्यात एका नंबरवर सर्वात जास्त कॉल्स होते. हा नंबर बेलीसाठी अनोळखी होता. जेव्हा या नंबरबाबत बेलीने बॉयफ्रेन्डला विचारले तर त्या नंबरवर तो कुणाशीच बोलला नसल्याचे तो म्हणाला. 8 / 8बेलीच्या बॉयफ्रेन्डने चालाखी दाखवली. पण बेलीनेही त्याला चलाखीनेच पकडलं आणि त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. इतकंच नाही. बेलीने बॉयफ्रेन्डसंबंधी सर्व गोष्टींपासून स्वत:ला दूर केलं.