शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना लाल ना पिवळ्या..हॉटेल्समध्ये चादरी, टॉवेल आणि गाउन पांढऱ्याच रंगाचे का असतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:10 IST

1 / 6
Interesting Facts : तुम्ही कधी बाहेर फिरायला गेले असाल तर हॉटेलमध्ये नक्कीच थांबले असाल. हॉटेलमध्ये थांबलेले असताना तुमच्या लक्षात आलं असेल की, सगळेच बेडवरील चादरी, टॉवेल, पडदे आणि गाउन यांचा रंग सामान्यपणे पांढराच असतो. याच रंगाची चादर, टॉवेल का वापरले जातात याचा कधी विचार मनात आला का? आला असेल तर यामागचं कारणही जाणून घ्या...
2 / 6
निसर्गानं आपल्याला इतके रंग दिले आहेत, पण मग हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाच्याच कपड्यांचा अधिक वापर का केला जातो? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. एक्सपर्ट सांगतात की, पांढऱ्या रंगाकडे सन्मानाच्या रूपात पाहिलं जातं. प्राचीन काळात राजे-महाराजे सुद्धा याच रंगाचे कपडे वापरत होते. त्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना लक्झरी फील देण्यासाठी याच रंगाचे कपडे वापरले जातात.
3 / 6
पांढरा एक असा रंग आहे जो सुद्धा आणि फ्रेशनेसचं प्रतीक आहे. जगभरात या रंगाचा वापर शांततेसाठी केला जातो. जगभरातील लोकांमध्ये अनेक मतभेद असले तरी ते पांढऱ्या रंगाला स्वच्छता आणि आरामाशी जोडतात. हेही एक कारण आहे की, हॉटेल्समध्ये याच रंगाचे कपडे वापरले जातात.
4 / 6
काही एक्सपर्ट सांगतात की, जर तुम्ही निळे, काळे, गुलाबी किंवा कोणत्याही रंगाचे टॉवेल वापरले तर, चादरी वापरल्या तर हळूहळू त्यांचा रंग जातो. तेच पांढऱ्या रंगासोबत अशी काहीच समस्या नाही. हा रंगच जात नाही. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय आणि खर्च वाढवल्याशिवाय यांचा वापर केला जाऊ शकतो.
5 / 6
पांढरा रंग हा एक एव्हरग्रीन रंग आहे. तो कधीही आउट ऑफ फॅशन होत नाही. जास्तीत जास्त लोकांना पांढरेच कपडे आवडतात. इतकंच काय तर रूमालही पांढरेच वापरतात. हा रंग डोळ्यांना शांतताही देतो. याही कारणामुळे हॉटेल्समध्ये पांढऱ्या रंगाचा अधिक वापर होतो.
6 / 6
वेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये मळ लपून राहतो. तर पांढऱ्या रंगाच्या कपड्यांवर मळ किंवा डाग लगेच दिसून येतात. ज्यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी पाठवले जाऊ शकतात. पाहुण्याना देखील स्वच्छ पांढरे कपडे बघून विश्वास बसतो की, त्यांना स्वच्छ कपडेच देण्यात आले आहेत. हेही हॉटेलमध्ये पांढरे कपडे वापरण्यामागचं एक कारण असतं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स