शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील एक असं फूल ज्यावर कधीच बसत नाही भुंगा, नाव वाचून बसणार नाही आपला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:11 IST

1 / 6
Interesting Facts : फुले केवळ मनुष्यांनाच नाही तर अनेक जीवांनाही आवडतात. त्यामुळे फुलांभोवती फुलपाखरे आणि भुंगाही फिरत असतो. त्यांवर बसतात. जवळपास सगळ्यात फुलांवर भुंगा बसतो. पण जगात एक असंही फूल आहे, ज्यावर भुंगा कमी बसतो किंवा बसतच नाही. हे फूल आपल्या आजूबाजूलाच उगवतं. पण या गोष्टीकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. खास बाब म्हणजे हे फुलाचा सुगंध खूप मनमोहक असतो आणि दिसायलाही सुंदर असतं. तरीही भुंगा यापासून दूर राहतो.
2 / 6
हे जगातील असं अनोखं फूल आहे ज्यावर भुंगा कधी बसत नाहीत. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण या फुलाचं नाव आहे चाफा. सामान्यपणे भुंगा, मधमाश्या आणि फुलपाखरे वेगवेगळ्या फुलांवर बसतात, परागकण आणि त्यांमधील रस गोळा करतात. पण हे जीव चाफ्यावर कधी बसत नाहीत. चाफा केवळ आपल्या सुगंधासाठी नाही तर सुंदरतेसाठीही ओळखला जातो. पूजा करण्यापासून ते घराची सजावट करण्यापर्यंत या फुलांचा वापर केला जातो. पण यांवर भुंगा का बसत नाहीत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
3 / 6
चाफ्याच्या फुलांवर भुंगा किंवा कीटक अजिबात बसत नाहीत. हे निसर्गाचं एक रोचक रहस्य आहे. जे वैज्ञानिक कारणं आणि सांस्कृतिक सामान्यांशी निगडीत आहे. चाफ्याचं फूल पांढरं, पिवळं किंवा केसरी रंगाचं असतं. ही फुले आपल्या मनमोहक सुगंधासाठी खूप प्रसिद्ध आहेत.
4 / 6
आपण अनेकदा पाहतो की भुंगा बहुतेक फुलांवर बसलेले असतात. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चाफ्याच्या फुलांवर भुंगा कधीच बसत नाहीत. एक्सपर्टच्या मते, चाफ्याच्या फुलांना एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध असतो आणि या फुलांमध्ये परागकण नसतात. त्यामुळे भुंगा तर सोडाच, पण या फुलांच्या आसपासही फिरकत नाहीत.
5 / 6
फक्त भुंगाच नाही, तर फुलपाखरं आणि मधमाश्याही चाफ्याच्या फुलांजवळ येत नाहीत. चाफ्याच्या फुलांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे याचे झाड कायम हिरवेगार राहते. चाफ्याची फुले प्रामुख्याने पाच प्रकारांची असतात आणि ही सर्व फुले अत्यंत सुगंधी असतात.
6 / 6
भुंगा प्रामुख्याने परागकण आणि अमृतासाठी फुलांवर जातात. मात्र चाफ्याच्या फुलांमध्ये अमृतग्रंथीचा अभाव असतो. त्यामुळे भुंग्यांना या फुलांकडून काहीच मिळत नाही. तसेच चाफ्याच्या फुलांतून येणाऱ्या सुगंधामध्ये काही विशिष्ट रासायनिक तत्व असतात, जे भुंगा, मधमाश्या आणि फुलपाखरांसाठी अप्रिय ठरतात. याच कारणामुळे हे कीटक चाफ्याच्या फुलांपासून दूर राहतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके