Indian Railway: जर चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हर झोपला तर काय होईल? 99% लोकांना माहीत नाही रेल्वेची ही खास सिस्टिम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:26 IST
1 / 8भारतीय रेल्वे, हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वे हे वाहतुकीचे असे साधन आहे, ज्याने अगदी सर्वसामान्य वर्गातील लोकही प्रवास करतात. 2 / 8जर आपण रेल्वेने प्रवास केला असेल, तर आपल्याला माहीतच असेल, की केवळ एका इंजिनच्या सहाय्यानेच संपूर्ण रेल्वे कंट्रोल केली जाते. रेल्वे इंजिनमध्ये ड्रायव्हर असतो, त्याला लोको पायलट म्हटले जाते. पण विचार करा, जर रेल्वेच्या ड्रायव्हरला झोप लागली तर काय होईल? ट्रेनला मोठा अपघात होईल? चला, तर जाणून घेऊया...3 / 8रेल्वेमध्ये असतात दोन ड्रायव्हर - रेल्वेने हजारो प्रवासी एकाच वेळी प्रवास करत असतात. अशा स्थितीत ड्रायव्हर झोपल्यास कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नेये यासाठी रेल्वेने एका खास शक्कल लढवली आहे. महत्वाचे म्हणजे रेल्वेमध्ये ड्रायव्हरशिवाय, एक अस्सिटन्ट ड्रायव्हरही असतो. 4 / 8जर चालत्या रेल्वेत ड्रायव्हर झोपला तर असिस्टन्ट ड्रायव्हर त्याला उठवतो. तसेच, काही गंभीर समस्या निर्माण झाल्यसा पुढील स्थानकावर याची सूचना दिली जाते आणि ट्रेन थांबवली जाते. यानंतर स्थानकावरून रेल्वेसाठी नवा ड्रायव्हर दिला जातो.5 / 8जर दोन्ही ड्रायव्हर झोपले तर? आता अनेक लोकांच्या मानात प्रश्न निर्माण झाला असेल, की जर रेल्वेतील दोन्ही ड्रायव्हर झोपले तर काय होईल? तर असे होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, असे असले तरी, रेल्वेने यासाठी ट्रेनच्या इंजिनमध्ये 'व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाईस' बसवले आहे. 6 / 8ट्रेनच्या इंजिनमध्ये बसवण्यात आलेले हे डिव्हाईस अशा स्थितीत मोठे कामाचे आहे. जर ड्रायव्हरने एक मिनिट कुठलीही क्रिया केली नाही, तर 17 सेकंदांत ऑडिओ व्हिज्युअल इंडिकेशन येते. ते ड्रायव्हरला बटण दाबून स्वीकारावे लागते. ड्रायव्हरने या संकेताला प्रतिसाद दिला नाही, तर 17 सेकंदांनंतर अपोआप ब्रेक लागायला सुरुवात होते. 7 / 8अपोआप थांबते ट्रेन - रेल्वे चालवताना ड्रायव्हला वारंवार वेग कमी अधिक करावा लागतो आणि हॉर्न देखील वाजवावा लागतो. म्हणजेच ड्युटीवर असताना चालक पूर्णपणे सक्रिय असतो. जर त्याने एक मिनिट कुठलाही रिस्पान्स दिला नाही, तर रेल्वे हा ऑडिओ व्हिज्युअल संकेत पाठवते. 8 / 8यानंतर, ड्रायव्हरकडून कुठलाही प्रतिसाद मिळला नाही, तर 1 किमी अंतरावरच रेल्वे थांबते आणि रेल्वेतील इतर कर्मचारी प्रकरणाची दखल घेतात. अशा पद्धतीने रेल्वे मोठे अपघात होण्यापासून रोखते.