शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ATMमधून फाटलेल्या नोटा आल्यावर काय करायचं? कुठे बदलायच्या? जाणून घ्या प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 5:08 PM

1 / 6
Banking News: आताच्या काळात ATMमधून पैसे काढणे अतिशय सोपे झाले आहे. परंतु, काहीवेळा एटीएममधून पैसे काढताना फाटलेल्या नोटा बाहेर येतात. यामुळे ग्राहकांना अनेक अडचणी येतात. या फाटलेल्या नोटा कोणताही दुकानदार घेत नाही, त्यामुळे तुम्हालाही नाहक त्रासाचा सामना करावा लागतो. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. एटीएममधून आलेल्या फाटलेल्या नोटा तुम्ही सहज बदलू शकता.
2 / 6
एटीएममधून फाटलेल्या नोटा आल्या, तर त्या बदलण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जातात त्या बँकेकडे अर्ज करावा लागेल. या अर्जात एटीएमची तारीख, वेळ आणि ठिकाण लिहावे लागेल. तसेच तुम्हाला पैसे काढण्याची स्लिप जोडावी लागेल.
3 / 6
तुमच्याकडे स्लिप नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजची माहिती द्यावी लागेल. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणतीही सरकारी बँक नोटा बदलून देऊ शकते. त्यामुळे आता तुम्हाला फाटलेल्या नोटा सहज बदलून मिळू शकतात आणि या प्रक्रियेला जास्त वेळही लागत नाही.
4 / 6
ट्विटरवर एका ग्राहकाच्या तक्रारीची माहिती देताना बँकेने या परिस्थितीत ग्राहकांनी कोणती पावले उचलली पाहिजेत हे सांगितले. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली, 'आमच्या एटीएममध्ये नोटा लोड करण्यापूर्वी, त्या अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे तपासल्या जातात.
5 / 6
त्यामुळे फाटलेल्या नोटा ग्राहकांना मिळू शकत नाहीत. तरीदेखील एखादी फाटलेली नोट आली, तर तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेतून नोटा बदलून घेऊ शकता.' बँकेने सांगितले की, https://crcf.sbi.co.in/ccf/ वर देखील तक्रार करू शकता. ही लिंक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे.
6 / 6
कोणतीही बँक एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. असे असतानाही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकांच्या तक्रारीच्या आधारे बँकेला 10 हजारांपर्यंतचे नुकसानही भरावे लागू शकते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIndian Currencyभारतीय चलनatmएटीएमbankबँक