1 / 7Pleasure Marriage: जगभरात वेगवेगळ्या परंपरा असतात. ज्या हैराण करणाऱ्या किंवा धक्कादायक असतात. लग्नासंबंधी तर अनेक विचित्र प्रथा भारतासह वेगवेगळ्या देशांमध्ये बघायला किंवा ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला लग्नासंबंधी अशाच एका प्रथेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. एक असा देश आहे जिथे 15 दिवसांसाठी व्यक्तीला पत्नी मिळते. म्हणजे महिला 15 दिवस तुमच्यासोबत राहू शकते आणि नंतर तिला घटस्फोट देता येतो.2 / 7मीडिया रिपोर्टनुसार, इंडोनेशियातील गरीब महिला पैशांच्या बदल्यात 15 दिवसांठी एका पुरूषाची पत्नी बनतात. म्हणजे 15 दिवस त्या पुरूषासोबत पत्नीसारखं रहावं लागतं. 3 / 7असं सांगितलं जातं की, या महिला महागाईच्या काळात घराचा खर्च उचलण्यासाठी असं काही दिवसांचं लग्न करतात. या 15 दिवसांच्या लग्नादरम्यान महिला पुरूषाच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासोबतच घरातील कामेही करतात.4 / 7रिपोर्टनुसार, या प्रथेला 'प्लेजर मॅरेज' किंवा 'निकाह मुताह' म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या प्रथेच्या माध्यमातून काही महिला तर एका वर्षात अशाप्रकारे 20 ते 25 लग्न करतात. 5 / 7ही प्रथा इंडोनेशियातील पर्यटन स्थळ पुनकक भागात जास्त बघायला मिळते. हा परिसरातील नैसर्गिक सौंदर्य कमाल आहे आणि इथे अरब लोकांचा प्रभाव अधिक आहे. अरब लोक इथे जास्त फिरायला आणि व्यवसाय करण्यासाठी येतात.6 / 7अरब देशांमधून इथे फिरायला येणारे श्रीमंत पर्यटकच इथे अशाप्रकारचं लग्न करतात. ज्यांना पैशांची गरज असते अशा महिला या लोकांसोबत 15 दिवसांसाठी लग्न करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. जेव्हा पर्यटक इथून जातात तेव्हा लग्न आपोआप मोडतं. 7 / 7India.com वेबसाईटनं लॉस एंजिल्स टाइम्सच्या हवाल्यानं सांगितलं की, एका महिलेनं स्वत: कबूल केलं की, जेव्हा ती 17 वर्षांची होती तिनं अशाप्रकारे 15 वेळा लग्न केलं होतं. एका लग्नातून साधारणपणे 300-500 डॉलर कमाई होते.