शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिमेंट केवळ घरासाठी नाही तर 'या' सुंदर वस्तू बनवण्यासाठीही ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 3:46 PM

1 / 14
सिमेंटचा वापर केवळ घर बांधतानाच केला जातो हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पण आज आम्ही तुम्हाला सिमेंटचा वेगळ्याप्रकारे वापर कसा करावा हे सांगणार आहोत. याने तुम्ही तुमच्या घरातील टाकावू वस्तूंना सुंदर बनवू शकता. त्यासोबतच सिमेंटपासून या सुंदर वस्तू मित्रांना भेटही देऊ शकता.
2 / 14
पुस्तकांचं लॅम्प लॅंड - पुस्तकाला भीजवलेल्या सिमेंटला टाका आणि बाहेर काढा. तुम्हाला किती उंचीचं लॅम्प लॅंड हवं त्यानुसार पुस्तके घ्या.
3 / 14
अंड्याच्या आकाराचं मॅग्नेट - अंड्याचं कव्हर वरुन थोडं फोडून त्यात आधी चुंबक टाका, त्यानंतर त्यात व्हाइट सिमेंट भरा. हे चांगलं वाळू द्या आणि नंतर अंड्याचं कव्हर फोडा.
4 / 14
बल्बचं वॉल हॅंगिंग - एक बल्ब घ्या त्यात सिमेंट भरा आणि त्यात एक मोठा खिळा टाका. नंतर ते सुकू द्या. सुकल्यावर बल्ब तोडून खिळ्याच्या मदतीने भींतीवर लावा. यावर तुम्ही काहीही ठेवू शकता.
5 / 14
केक पॅन स्टॅंड - केक पॅनमध्ये सिमेंट टाकून एक मोठी काठी लावून सुकू द्या. सुकल्यानंतर केक पॅन बाहेर काढा. हे स्टॅंड तुम्ही बाथरुममध्ये वापरु शकता.
6 / 14
पेपर बॅगचा फ्लॉवर स्टॅंड - पेपर बॅगमध्ये सिमेंट भरुन एका प्लॅस्टिकच्या डब्यात टाकून सुकू द्या. सुकल्यानंतर डबा काढून घ्या. याचा एक फ्लॉवर स्टॅंड तयार होईल.
7 / 14
बॉटलचा कॅंडल स्टॅंड - एका रिकामी बॉटल वरुन कापा, मग त्यात सिमेंट भरा आणि त्यात एक ग्लास ठेवा. सीमेंट सुकल्यानंतर बॉटल कापून बाजूला करा.
8 / 14
कोल्ड्रींकच्या बॉटलचं स्टॉपर - एक रिकामी बॉटल मधून कापा. त्यात सिमेंट भरा, हे तुम्ही दरवाज्यासाठी स्टॉपर म्हणून वापरु शकता.
9 / 14
सोप केस - एखादा डबा किंवा बॉटलमध्ये सिमेंट भरुन त्याने तुम्ही सोप केसही तयार करु शकता.
10 / 14
शूजचा फ्लॉवर पॉट - फाटल्यावर किंवा जास्तच खराब झाल्यावर अनेकजण शूज फेकतात. पण आता ते न फेकता त्याचा असा वापर तरा. शूजना वरुन सिमेंटने भीजवा. कोरडं झाल्यावर त्यात फूल ठेवा. एक वेगळा पॉट तयार होईल.
11 / 14
पॉलीथिनचा दिवा - छोट्या छोट्या पॉलीथिनमध्ये सिमेंट भरा. सुकल्यानंतर प्लॅस्टिक बाजूला काढा. यावर तुम्ही दिवे ठेवू शकता.
12 / 14
नॅपकिनचा पॉट - हात पुसण्यासाठी वापरला जाणारा छोटा टॉवेल सिमेंटमध्ये भीजवा आणि कोरडा करुन घ्या. एक ग्लास उलटा ठेवा. त्यावर नॅपकिन ठेवा. हवं तसं डिझाइन करा.
13 / 14
सीमेंटचा कॉर्नर स्टूल - कॉर्नर स्टूलसाठी एका टबमध्ये सिमेंट टाका आणि त्यात खराब स्टम्प किंवा जाड काठ्या असतील त्या सीमेंटमध्ये योग्य प्रकारे ठेवा. त्यानंतर ते टबमधून बाहेर काढा.
14 / 14
क्रोशियाचा कॅंडल स्टॅंड - एका कटोऱ्यामध्ये सिमेंट घेऊन क्रोशियाचं तयार केलेलं कवर चांगल्याप्रकारे बुडवा. त्यानंतर ते एका उलट्या कटोऱ्यावर सुकण्यासाठी ठेवा. सुकल्यावर कटोरा काढून टाका.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्