महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सापडला दोन तोंड असलेला दुर्मीळ शार्क मासा, फोटो व्हायरल
By अमित इंगोले | Updated: October 17, 2020 16:01 IST
1 / 10शार्क माशाचं नाव ऐकताच एक खतरनाक जबडा आपल्या डोळ्यांसमोर येतो. शार्क नेहमीच मनुष्यासाठी आकर्षण राहिला आहे. शार्क मासा हा आपल्या ताकदीसाठी ओळखला जातो. आतापर्यंत तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेकदा शार्क मासा पाहिला असेल. पण तुम्ही कधी दोन तोंड असलेला शार्क मासा पाहिलाय का? नाही ना? पण पालघरमधील सतपती गावात एक दुर्मीळ शार्क मासा सापडला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2 / 10नितीन पाटील नावाच्या मासेमारी करणाऱ्या व्यक्तीने हा दोन तोंड असलेला शार्क मासा पकडलाय. त्याने सांगितले की, नेहमीप्रमाणे तो मासे पकडण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यावर होता. तेव्हाच हा छोटा शार्क मासा पाहून तो अवाक् झाला.3 / 10दोन तोंडाचे साप तर अनेकदा बघायला मिळतात पण दोन तोंड असलेला मासा बघायला मिळणं एक आश्चर्याचीच बाब आहे. या अनोख्या शार्क माशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा शार्क मासा पाटील यांनी नंतर समुद्रात सोडून दिला.4 / 10या शार्क माशाची लांबी ६ इंच असल्याचे सांगण्यात आणि त्याला दोन तोंड आहेत.5 / 10सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी सांगितले की, दोन तोंड असलेला शार्क मासा मिळण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. याआधी भारतात कधीही असा शार्क मासा बघण्यात आला नाही.6 / 10काही वर्षांआधी मेक्सिकोमधील संशोधकांनी दोन तोंड असलेल्या शार्कचा शोध लावला होता. त्यानंतर २०१६ मध्ये असाच मासा आढळून आला होता.7 / 10तज्ज्ञ सांगतात की, या दुर्मीळ घटनेला डिसेफली असं म्हटलं जातं आणि अनेक प्राण्यांमध्येही असा प्रकार बघायला मिळतो. 8 / 10शार्क मासा हा सर्वात जास्त जगणाऱ्या जीवांपैकी एक आहे. हा मासा १५० पेक्षा जास्त वर्षे जिवंत राहू शकतो. तसेच यांचा वेगही जास्त असतो. जगातल्या सर्वात वेगवान सेल्मन मासा ५५ मैल प्रति तासाच्या वेगाने पुढे सरकतो.9 / 10शार्क मासा हा सर्वात जास्त जगणाऱ्या जीवांपैकी एक आहे. हा मासा १५० पेक्षा जास्त वर्षे जिवंत राहू शकतो. तसेच यांचा वेगही जास्त असतो. जगातल्या सर्वात वेगवान सेल्मन मासा ५५ मैल प्रति तासाच्या वेगाने पुढे सरकतो.10 / 10शार्क मासा हा सर्वात जास्त जगणाऱ्या जीवांपैकी एक आहे. हा मासा १५० पेक्षा जास्त वर्षे जिवंत राहू शकतो. तसेच यांचा वेगही जास्त असतो. जगातल्या सर्वात वेगवान सेल्मन मासा ५५ मैल प्रति तासाच्या वेगाने पुढे सरकतो.