खरंच? रबरासारखं लवचीक आहे १३ वर्षांच्या चिमुरडीचं शरीर; लॅपटॉप चालवणं, होमवर्क सगळं काही करते पायानं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 17:56 IST
1 / 8तुम्ही रबराची बाहूली अनेकदा पाहिली असेल. रबराच्या बाहुलीला जसं वाकवाल तशी ती वाकते. पण कोणत्या माणसाचं किंवा मुलीचे शरीर रबरासारखं असू शकतं याचा तुम्ही विचार कधीही केला नसेल. पश्चिम लंडनची रहिवासी असलेली १३ वर्षीय रॉक्सी कोबीलिऊख आपल्या लवचीक शरीरामुळे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. 2 / 8आहे. तिचं शरीर इतकं लवचीक आहे की ती स्वतःच्या शरीराला कोणत्याही प्रकारे फोल्ड करू शकते. दर आठवड्याला रॉक्सी जवळपास १५ तास स्वतःला ट्रेनिंग देते.3 / 8१३ वर्षांच्या रॉक्सीला सुपर फ्लेक्सिबल शरीरामुळे ओळखलं जात आहे. ती आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारे फोल्ड करू शकते. इतकंच नाही तर आपला होमवर्कसुद्धा पायांनीच करते4 / 8स्वतःला लवचीक बनवण्यासाठी रॉक्सी दर आठवड्याचून १५ तास स्वतःला ट्रेनिंग जेते. यादरम्यान ती आपली रोजची कामं पायांनी करण्याचा प्रयत्न करते. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ती डाव्या पायानं लॅपटॉप चालवणं, होमवर्क करणं अशी कामं करत आहे. 5 / 8रॉक्सी सराव करत असताना अभ्यासही पूर्ण करते. स्ट्रेचिंग करत असताना तिचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं होतो असं ती म्हणते.6 / 8जगातील सगळ्यात जास्त लवचीक शरीर असलेल्या मुलीच्या रूपानं रॉक्सीची ओळख आहे.7 / 8सोशल मीडियावर रॉक्सीचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर असून ते या मुलीचं टॅलेंट पाहून हैराण होत आहेत.8 / 8१३ वर्षांच्या रॉक्सीच्या पालकांना अजिबात माहित नव्हते की त्यांच्या मुलीमध्ये इतके टॅलेंट आहे. रॉक्सी सांगतेल की, ''मला सरळ, नीट बसायला कधीही आवडत नाही. जेव्हाही मला वेळ मिळेल मी सराव सुरू करते.''