By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 15:53 IST
1 / 11सध्याचं युग हे सोशल मीडियाचं आहे असं आपण अनेकदा ऐकतो. अनेकजण सोशल प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह असतात. सर्व सोशल मीडिया साइट्सपैकी फेसबुकला युजर्सची सर्वात जास्त पसंती मिळते. एका रिपोर्टमधून असं सिद्ध झालं आहे की, संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतामध्ये फेसबुक युजर्सची संख्या जास्त आहे. त्यामुळेच भारतातील सेलिब्रिटीही फेसबुकवर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असतात. जाणून घेऊयात भारतातील टॉप 10 सेलिब्रिटी जे फेसबुकवर सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.2 / 11संपूर्ण देशासह जगभरातही मोदींची लोकप्रियता वाढत असतानाच फेसबुकवरही मोदींनी बाजी मारली आहे. फेसबुकवरील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये मोदींचे फॉलोअर्स इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत अधिक आहेत. मोदीच्या फॉलोअर्सची संख्या 42,746,846 इतकी आहे.3 / 11बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. पण तरिसुद्धा भारतातील अनेक चाहत्यांच्या मनात तिनं तिचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. फेसबुकवरील सर्वात जास्त फॉलोअर्सची संख्या असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये ही दुसऱ्या स्थानावर असून 37,085,928 इतकी फॉलोअर्सची संख्या आहे.4 / 11सध्या भारतीय क्रिकेट संघाचा डोलारा सांभाळणारा कर्णधार विराट कोहली या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर असून फेसबुवर त्याची फॉलोअर्सची संख्या 36,815,348 इतकी आहे.5 / 11बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानही या शर्यतीत मागे नाही. या यादीमध्ये सलमान चौथ्या स्थानावर असून फेसबुकवर 36,239,788 इतके त्याचे फॉलोअर्स आहेत.6 / 11बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी दीपिका सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. दीपिकाचा या यादिमध्ये पाचव्या क्रमांक असून 34,187,485 इतकी तिची फॉलोअर्सची संख्या आहे.7 / 11बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही या यादीमध्ये समावेश आहे. वयाच्या पंच्यात्तरीतही त्यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असाच आहे. सोशल मीडियावरही बीग बी बरेच अॅक्टिव्ह असतात. 30,288,189 इतके फॉलोअर्स आहेत. 8 / 11सोशल मीडियाच्या बाबतीत किंग खानही मागे नाही. फेसबुकवर शाहरूख खानला 30,288,189 लोकं फॉलो करतात. 9 / 11आपल्या आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रेया घोषालचाही या यादिमध्ये समावेश आहे. श्रेयाचे फेसबुकवर 29,387,666 फॅन आहेत.10 / 11कॅप्टन कूल अशा ख्याती असलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही या यादीमध्ये आहे. धोनीला फेसबुकवर 29,387,249 इतक्या लोकांनी फॉलो केले आहे.11 / 11सुपरहिट रॅपर यो यो हनी सिंग जगभरात आपल्या गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हनी सिंग फेसबुकवर 28,828,572 फॉलोअर्स आहेत.