By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 15:45 IST
1 / 5पिग आयलँड, बहामाज : बहामामधील पिग आयलँडवर 20 डुकरं राहतात. ही डुकरं इकडे कशी आली, याच्या विविध कहाण्या सांगितल्या जातात. त्यातील सर्वात प्रसिद्ध कहाणी नावाड्यांची आहे. काही नावाड्यांनी या बेटावर डुकरं आणून सोडली. पुन्हा बेटावर आल्यास परतीच्या प्रवासात डुकरावंर आडवा हात मारता येईल, असा त्यांचा इरादा होता. मात्र नावाडी पुन्हा बेटावर आलेच नाहीत. त्यामुळे डुकरं बेटावरच राहिली. 2 / 5डीअर आयलँड, जपान : सामान्यपणे हरणं माणसापासून दूर राहणं पसंत करतात. मात्र जपानमधील मियाजिमा या लहानशा बेटावरील हरणं मात्र माणसाळलेली आहेत. जपानी संस्कृतीनुसार हरणांना देवदूत समजलं जातं. त्यामुळे या ठिकाणी हरणांना मारल्यास फाशीची शिक्षा दिली जाते. 3 / 5कॅट आयलँड, जपान : जपानच्या ओशिमा बेटावर मांजरींचं साम्राज्य आहे. या बेटावर 130 मांजरी असून 13 माणसं आहेत. बेटावरील उंदरांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी या ठिकाणी मांजरी आणल्या गेल्या होत्या.4 / 5हॉर्स आयलँड, अमेरिका : अमेरिकेच्या अखत्यारित येणाऱ्या अॅसाटेगे बेटावर 300 घोडे आहेत. हे बेट पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. 5 / 5रॅबिट आयलँड, जपान : जपानच्या ओकुनोशिमा बेटाला रॅबिट आयलँड म्हणून ओळखलं जातं. या बेटावर 1 हजार ससे आहेत. 1971 मध्ये काही शाळकरी मुलांनी या भागात ससे सोडले. या बेटावरील कुत्रे आणि मांजरी मारण्यास बंदी आहे. त्यामुळे या बेटावर सशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.