शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्यांदाच 'आईच्या दूधाची' लॅबमध्ये निर्मिती, खुल्या बाजारात विकण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 1:26 PM

1 / 10
कोणत्याही नवजात बाळाच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी आईचे दूध सर्वोत्कृष्ट मानले जाते. दरम्यान, तंत्रज्ञानाने अशा स्तरावर प्रगती केली आहे की, आता विज्ञान प्रयोगशाळेत नवजात बाळांसाठी आईचे दूध (ब्रेस्ट मिल्क) तयार करण्याची पद्धत शोधली आहे.
2 / 10
बायोमिल्क नावाच्या एका स्टार्ट-अपने महिलांच्या स्तनाच्या पेशींपासून दूध तयार करण्यात यश मिळविले आहे. या कंपनीतील बहुतांश महिला आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, लॅबमध्ये तयार केलेल्या या दुधात मोठ्या प्रमाणात सर्व पौष्टिक घटक आहेत, जे सहसा आईच्या दुधात आढळतात.
3 / 10
कंपनीचा असा दावा आहे की, मॅक्रोन्यूट्रिएंट प्रोफाइलनुसार, त्यात सर्व प्रकारचे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅटी अॅसिडस् आणि बायोअॅक्टिव्ह लिपिड्स असतात जे कोणत्याही आईच्या दुधात आढळतात. मात्र, दोन्ही दुधांमधील अँटिबॉडीजमध्ये फरक आहे.
4 / 10
या कंपनीच्या सह-संस्थापक आणि मुख्य विज्ञान अधिकारी डॉ. लीला स्ट्रिकलँड यांनी 'फोर्ब्स'ला सांगितले की, अँटिबॉडी नसले तरीही, आमच्या उत्पादनाची पौष्टिक आणि बायोएक्टिव कंपोजिशन इतर कोणत्याही उत्पादनांपेक्षा जास्त आहे आणि हे आईच्या दुधासारखे अगदी साम्य आहे.
5 / 10
त्या पुढे म्हणाले की, आमचे उत्पादन रोगप्रतिकार विकास, आतड्यांसंबंधी परिपक्वता, मेंदूच्या विकासाला ज्याप्रकारे सपोर्ट करते. तसे इतर कोणत्याही उत्पादन करू शकत नाही.
6 / 10
येत्या तीन वर्षात हे उत्पादन बाजारात उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही डॉ. लीला स्ट्रिकलँड यांनी सांगितले.
7 / 10
वरिष्ठ सेल बायोलॉजिस्ट डॉक्टर स्ट्रिकलँड यांनी स्वतःच्या अनुभवानंतर ब्रेस्ट मिल्कच्या पर्यायावर काम करण्यास सुरवात केली. दरम्यान, त्यांचा मुलाचा प्रीमेच्योर जन्म झाला होता आणि यामुळे त्यांना आईचे दूध पुरविणे शक्य झाले नाही.
8 / 10
यानंतर 2013 मध्ये त्यांनी एका लॅबमध्ये स्तनाच्या पेशींपासून दूध तयार करण्यास सुरवात केली होती. त्यानंतर, खाद्य शास्त्रज्ञ मिशेल एगर यांच्या सहकार्याने त्यांनी सन 2019 मध्ये एक स्टार्टअप सुरू केला.
9 / 10
या कंपनीच्या संस्थापकांचे म्हणणे आहे की, त्यांचे स्तनपान रोखण्याचे उद्दिष्ट नाही परंतु त्यांच्या उत्पादनाद्वारे त्यांना महिलांना पर्याय उपलब्ध करुन द्यायचे आहेत.
10 / 10
आमचा विश्वास आहे की कोणत्याही मुलाच्या काळजीसाठी फक्त एकच पद्धत योग्य असू शकत नाही आणि प्रत्येकास आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्याचा अधिकार असावा. आम्ही या उत्पादनाच्या मदतीने लोकांना अधिक पर्याय प्रदान करू इच्छितो, असे या कंपनीच्या साइटवर असे लिहिले आहे.
टॅग्स :milkदूधJara hatkeजरा हटकेscienceविज्ञान