खळबळजनक खुलासा! नोवाक जोकोविचसोबत सेक्स टेप बनवण्याची 'या' मॉडलला मिळाली होती ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 13:37 IST
1 / 11सर्बियाची मॉडल नतालीजा स्केकिकने एक खळबळजनक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, तिला जगातील नं. १ टेनिस स्टार नोवाक जोकोविचसोबत सेक्स टेप तयार करण्यासाठी ५० लाख रूपयांची ऑफर दिली गेली होती. इन्स्टाग्राम स्टारने यूरोपियन मॅगझिन स्वेट अॅंन्ड स्कॅंडलसोबत बोलताना सांगितले की, या डीलचा पूर्ण उद्देश नोवाकचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करणं हा होता.2 / 11ती म्हणाली की, हे खरंय की, एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क केला होता. मी त्याला आधीपासून ओळखत होते आणि त्याला एक फार गंभीर प्रोफेशनल समजत होते. त्याने मला डेटसाठी विचारलं होतं आणि मला वाटलं होतं की, बिझनेसबाबत त्याला माझ्याशी बोलायचं असेल. पण हळूहळू मला जाणीव झाली की, हे माझ्या जीवनाशी संबंधित नाही. तर नोवाकचं लाइफ खराब करण्यासाठी प्लॅन केला जात आहे.3 / 11नतालीजा पुढे म्हणाली की, त्या व्यक्तीने मला सांगितले होते की, मला नोवाकसोबत फ्लर्ट करायचं आहे. त्याला एका रोमॅंटिक ठिकाणी घेऊन जाऊन त्याच्यासोबत सेक्स टेप तयार करायची आहे. मला वाटलं ती व्यक्ती गंमत करत आहे. पण तो पूर्णपणे गंभीर होता.4 / 11मॉडल म्हणाली की, त्याने मला या कामासाठी ६० हजार यूरो आणि जगात कुठेही फिरण्याची एक ट्रिप ऑफर केली होती. ती म्हणाली की, ती त्याचं हे बोलणं ऐकून संतापली होती. त्याच्या अंगावर पाणी फेकण्याची इच्छा झाली होती. पण आम्ही सार्वजनिक ठिकाणी होतो. 5 / 11सोशल मीडिया स्टार म्हणाली की, मी माझं सामान घेतलं आणि तेथून निघून गेले. मला आशा आहे की, असं काम करणारी एकही मुलगी त्याला भेटणार नाही. कारण हे नोवाकसोबत वाईट होईल. नोवाक जगातील सर्वात बेस्ट खेळाडूंपैकी एक आहे. तो आमच्या देशाचा सर्वात मोठा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहे. तसाच तो एक आदर्श फॅमिली पर्सन आहे.6 / 11मला आशा आहे की, या खुलाशानंतर इतरही महिला या कामासाठी समोर येणार नाहीत. दरम्यान नोवाक आणि त्याची पत्नी जेलेना यांची लग्न २०१४ मध्ये झालं होतं. नोवाक आणि जेलेना यांच्या नात्याबाबत अनेक अफवाही येत असतात.7 / 11अशात २०२० मध्ये नोवाक म्हणाला होता की, माझ्या आणि जेलेनाच्या डिवॉर्सबाबत लोकांना फारच उत्सुकता आहे. आम्ही दोघेही एकमेकांचा सन्मान करतो आणि आमचं नातं मजबूत आहे.8 / 11२०१६ दरम्यान नोवाकचा फॉर्म खराब झाला होता. तो २०१६ मध्ये विम्बल्डन स्पर्धेतून तिसऱ्या राऊंडमधून बाहेर झाला होता. त्यानंतर तो ऑलंम्पिकच्या पहिल्या राउंडमधून बाहेर झाला होता. त्याची नं. १ रॅकिंग घसरली होती.9 / 11यानंतर तो २०१७ मध्ये फ्रेन्च ओपनच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला होता. यानंतर त्याने जबरदस्त वापसी केली होती आणि पुन्हा एकदा एटीपी टूर ऑफिशिअल रॅंकिंगमध्ये नं. १ रॅंकिंग मिळवण्यात यशस्वी ठरला होता.10 / 11यानंतर तो २०१७ मध्ये फ्रेन्च ओपनच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला होता. यानंतर त्याने जबरदस्त वापसी केली होती आणि पुन्हा एकदा एटीपी टूर ऑफिशिअल रॅंकिंगमध्ये नं. १ रॅंकिंग मिळवण्यात यशस्वी ठरला होता.11 / 11यानंतर तो २०१७ मध्ये फ्रेन्च ओपनच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला होता. यानंतर त्याने जबरदस्त वापसी केली होती आणि पुन्हा एकदा एटीपी टूर ऑफिशिअल रॅंकिंगमध्ये नं. १ रॅंकिंग मिळवण्यात यशस्वी ठरला होता.