इथं सरकार फुकटात देतंय जमीन पण, अट मात्र एकच! ती आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 19:19 IST
1 / 10आपल्या भारत (India) देशात लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र, असे काही देश आहेत, जिथं परिस्थिती खूपचं वेगळीय.2 / 10अलीकडच्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या (Australian town Quilpie) क्विल्पी शहरातून एक अनोखं प्रकरण समोर येतंय. येथील लोकसंख्या खूपच कमीय.3 / 10आकडेवारीनुसार, क्विल्पी शहराची लोकसंख्या केवळ 800 इतकी आहे.4 / 10अशा स्थितीत लोकसंख्या वाढवणं येथील प्रशासनासमोर एक मोठं आव्हान बनलंय.5 / 10इथल्या स्थानिक प्राधिकरणानं (Local Authority) लोकसंख्या वाढवण्यासाठी लोकांना मोफत जमीन देण्याचं जाहीर केलंय.6 / 10ऑस्ट्रेलियाच्या क्विल्पी शहरात खूप कमी लोक राहतात. अशा स्थितीत येथील स्थानिक प्राधिकरण लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतंय.7 / 10एवढंच नाही, तर येथे अनेक कामगारांचीही गरज आहे. स्थानिक प्राधिकरण येथील जमीन फ्री मध्ये देणार आहे. पण, अट अशी आहे की नागरिक ऑस्ट्रेलियाचा असावा.8 / 10क्विल्पी सिटी कौन्सिलनं (Quilpie City Council) शहरातील लोकसंख्येचा अभाव दूर करण्यासाठी अशी ऑफर दिलीय.9 / 10पश्चिम क्वीन्सलँड राज्याच्या या भागाला लोकसंख्येच्या अभावामुळे पशुपालन आणि मेंढीपालनाशी संबंधित नोकऱ्या भरण्यात अडचणी येत आहेत.10 / 10नगरपरिषदेला अजिबात अपेक्षा नव्हती, की शहरातील लोक मोकळ्या जमिनीच्या आमिषानं घरं बांधण्यासाठी येतील. परंतु, दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत, संपूर्ण ऑस्ट्रेलिया आणि परदेशातील २५० हून अधिक लोकांनी मोकळ्या जमिनीची चौकशी केलीय.