By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 15:36 IST
1 / 5पृथ्वीचा सर्वाधिक भाग हा समुद्राने व्यापलेला असल्यामुळे ही झाडं सर्वाधिक ऑक्सिजन तयार करतात. असं सांगण्यात येतं की, वातावरणातील 70 ते 80 टक्के ऑक्सिजन याच झाडांमुळे तयार होतो. ही झाडं जमिनीवरील झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन तयार करतात. 2 / 5 आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, ऑक्सिजन तयार करण्याचं काम झाडांची पानं करतात. पानं एका तायामध्ये 5 मिलीलीटर ऑक्सिजन तयार करतात. त्यामुळे ज्या झाडांना जास्त पानं असतात ती झाडं जास्त ऑक्सिजन तयार करतात. 3 / 5पिंपळाच्या झाडाचा विस्तार आणि उंची सर्वाधिक असते. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडासोबत धार्मिक भावानाही जोडलेल्या असतात. असं सांगण्यात येतं की, पिंपळाचं झाड रात्री ऑक्सिजन देतं. दिवसातून 22 तासापेक्षा जास्त वेळ हे झाड ऑक्सिजन देतं. 4 / 5पिंपळाच्या झाडाप्रमाणेच कडुलिंब, वड आणि तुळशीचं झाडंही जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतं. 5 / 5बांबूचं झाडं सर्वात लवकर वाढणारं झाड आहे. बांबूचं झाड हवा फ्रेश करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. बांबूचं झाडं इतर झाडांच्या तुलनेत 30 टक्के अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार करतं.