अंतराळातून आली पृथ्वीची छायाचित्रे; एवढी अप्रतिम की पाहतच राहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 12:21 IST
1 / 8नासा, इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्था सामान्यांना अंतराळाची सफर घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अंतराळातून पृथ्वी कशी दिसते? एखाद्या व्हिडीओमध्येच पाहिली असेल. पण अंतराळातून अंतराळवीरांनी खूप सुंदर फोटो कॅमेरामध्ये कैद केले आहेत. जरूर पहा...2 / 8हा फोटो भारत-चीन सीमेवरील हिमालय पर्वतरांगांचा आहे. 3 / 8बोलिव्हियास्थित हे तळे अद्भूत आहे. कारण याचा रंग रक्तासारखा लाल आहे. 4 / 8अर्जेंटिनाची पराना नदी ब्राजील, पेरुग्वेमधून वाहते. फोटोमध्ये पराना नदीचा दलदलीचा हिस्सा दाखविण्यात आला आहे. 5 / 8स्कँडिनेव्हिया म्हणजेच डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडनचा रात्रीचा फोटो.6 / 8हा भूभाग उत्तरेकडील कोलंबियामध्ये आहे. येथील पर्वतरांगा मन वेधून घेतात. 7 / 8अमेरिकेच्या हवाई बेटांवरील ज्वालामुखी आणि त्यांमधून निघणारा लाव्हारस आणि धूर. 8 / 8ऑफ्रिकेतील चॅड नदी विलुप्त झाली आहे. आता या नदीचे तळे बनले असून तेही गायब होण्याच्या मार्गावर आहे.