शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

World's tallest bodybuilder: वजन 150 किलो; चार लोकांच अन्न एकटा खातो, 'हा' आहे जगातील सर्वात उंच बॉडीबिल्डर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:02 IST

1 / 5
World's tallest bodybuilder: जगात एकापेक्षा-एक महान बॉडीबिल्डर होऊन गेले आणि आताही आहेत. अर्नोल्ड श्वार्झनेगर, रॉनी कोलमन, फिल हिथ अशी असंख्य लोकांची नावे घेता येतील. प्रत्येकजण आपल्या आगळ्या-वेगळ्या शारिरीक ठेवणीसाठी ओळखला जातो. यातच ऑलिव्हियर रिक्टर्स नावाचा बॉडीबिल्डर त्याच्या उंचीसाठी ओळखला जातो.
2 / 5
ऑलिव्हियर मूळचा नेदरलँडचा असून, तो एक प्रोफेश्नल बॉडीबिल्डर असण्यासोबत अभिनेतादेखील आहे. त्याने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ऑलिव्हियरचे नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. याचे कारण म्हणजे त्याची उंची. तो जगातला सर्वात उंच बॉडीबिल्डर आहे. दरम्यान, व्यावसायिक शरीरसौष्ठवपटूंचा आहार सामान्या लोकांपेक्षा खूप जास्त असतो. त्यांच्या शरीरानुसार त्यांना आहार घ्यावा लागतो. ऑलिव्हियरदेखील अशाच प्रकारचा आहार घेतो.
3 / 5
जगातील सर्वात उंच बॉडीबिल्डर ऑलिव्हियर रिक्टर्सची उंची तब्बल 7 फूट 2 इंच आणि वजन सुमारे 150 किलो आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, ऑलिव्हियरने सांगितले की, तो पूर्वी सुमारे 6500 ते 7000 कॅलरीज घेत असे. पण 'द इलेक्ट्रिकल लाइफ ऑफ लुईस वेन' या चित्रपटात त्याने बॉक्सरची भूमिका केली होती आणि त्याला वजन कमी करण्याची गरज होती. वजन कमी करतानाही तो सुमारे 5 हजार कॅलरीज घेत असे.
4 / 5
एका सामान्य माणसाला एका दिवसात सुमारे 1500 ते 2000 कॅलरीजची गरज असते. पण, ऑलिव्हियर 7000 कॅलरीज घेतो, म्हणजेच तो सुमारे 3-4 लोकांना लागणारे अन्न एकटाच खातो. ऑलिव्हियरने मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, माझे शरीर इतके मोठे आहे की, वजन कमी करतानाही मला किमान 5 हजार कॅलरीज घ्याव्या लागतात. एवढ्या कॅलरीज घेतल्या नाहीत, तर माझ्या स्नायूंना त्रास होतो. म्हणूनच मी सामान्यांपेक्षा खूप जास्क कॅलरीज खातो.
5 / 5

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेbodybuildingशरीरसौष्ठव