शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णसंधी! १२ तास फक्त चप्पल घाला अन् ४ लाख रूपये कमवा, बेरोजगारांसाठी अनोख्या नोकरीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 15:31 IST

1 / 8
जर तुम्हाला ही नोकरी हवी असेल तर तुम्हाला कंपनीच्या साइटवर जाऊन हे सांगावं लागेल की, तुम्ही परफेक्ट टेस्टर का आहात आणि कंपनीने तुम्हाला नोकरी का द्यावी? तुमचं उत्तर योग्य असेल तर तुम्हाला ही नोकरी मिळू शकते.
2 / 8
bedroomathletics.com या वेबसाइटवर तुम्हाला नोकरी संबंधिचे सर्व डिटेल्स मिळतील. यावर तुम्हाला तुमच्याबाबत सांगायचं आहे. दरम्यान कोरोना काळात अनेक लोकांची नोकरी गेली. अनेकजण बेरोजगार होऊन घरात बसलेत. त्यांच्याकडे पुढचा काही प्लॅन नाही. जर तुम्हीही या लोकांपैकी एक असाल तुम्हाला पैसे कमावण्याची एक चांगली संधी आहे.
3 / 8
सोशल मीडियावर एका चप्पल कंपनीची नोकरीसंबंधिची जाहिरात व्हायरल झाली आहे. यात तुम्हाला काही खास करायचं नाहीये. केवळ घरात बसून चप्पल घालून तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे. इतकंच केल्यावर कंपनी तुम्हाला चार लाख रूपये वर्षाला पगार देईल.
4 / 8
बेडरूम एथलेटिक्स नावाची ही कंपनीने गेल्यावर्षी सुद्धा नोकरीची जाहिरात दिली होती. यावर कंपनीला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता.
5 / 8
या लिंकवर जाऊन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता आणि तुम्ही सगळी माहिती त्यांना आवडली तर तुम्हाला ही नोकरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
6 / 8
या नोकरीत तुम्हाला महिन्यातले केवळ २ दिवस चप्पल टेस्टिंग करायची आहे. यात तुम्हाला दिवसातील १२ तास चप्पल घालून रहायचं आहे. कंपनीने जाहिरातीत लिहिले आहे की, यासाठी निवडल्या जाणाऱ्या व्यक्तीला कंपनी आणि दुसऱ्या नाइट विअर्सचेही कम्फर्ट टेस्टिंग करावं लागेल.
7 / 8
जर तुम्हाला ही नोकरी हवी असेल तर तुम्हाला कंपनीच्या साइटवर जाऊन हे सांगावं लागेल की, तुम्ही परफेक्ट टेस्टर का आहात आणि कंपनीने तुम्हाला नोकरी का द्यावी? तुमचं उत्तर योग्य असेल तर तुम्हाला ही नोकरी मिळू शकते.
8 / 8
या लिंकवर जाऊन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता आणि तुम्ही सगळी माहिती त्यांना आवडली तर तुम्हाला ही नोकरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेjobनोकरीSocial Viralसोशल व्हायरल