शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Happy New Year 2020 : 'या' ठिकाणी अजब पद्धतीने केलं जातं नववर्षाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 13:15 IST

1 / 10
नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात 2020 चे स्वागत करण्यात आले आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र अनेक ठिकाणी अजब पद्धतीने नववर्षाचं स्वागत केलं जातं.
2 / 10
ग्रीकमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर कांदे लटकवले जातात.
3 / 10
स्पेनमध्ये 12 वाजल्यानंतर 12 द्राक्ष खाण्याची परंपरा आहे.
4 / 10
बोलिवियामध्ये मिठाईमध्ये नाणी मिक्स केली जातात. जी व्यक्ती ते नाणं शोधण्यात यशस्वी होईल त्याचं संपूर्ण वर्ष आनंदाचं असतं असं मानलं जातं.
5 / 10
कोलंबियामध्ये चांगल्या भविष्यासाठी लोक पहिल्या दिवशी सूटकेस घेऊन फिरतात. असं केल्यास पूर्ण वर्ष मजेत फिरता येतं.
6 / 10
नववर्षाच्या निमित्ताने थायलंडमध्ये लोक एकमेकांवर पाणी आणि पावडर फेकतात.
7 / 10
बेल्जियममध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाळीव प्राण्यांवर प्रेम केलं जातं.
8 / 10
रोमानियामध्ये शेतकरी नवीन वर्षाची सुरूवात ही गायींशी संवाद साधून करतात.
9 / 10
नववर्षात दक्षिण आफ्रिकेत फर्निचर खिडकीतून बाहेर फेकलं जातं.
10 / 10
फ्रान्समध्ये घरामध्ये केक तयार करून खाण्याची परंपरा आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFranceफ्रान्सSouth Africaद. आफ्रिकाNew Yearनववर्ष