२ वर्षापेक्षा जास्त काळ गायब होती सर्वात महाग मोनालिसाची पेंटींग, वाचा पोलिसांना कुठे सापडली होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 17:10 IST
1 / 9पॅरिसच्या लूव्र म्युझिअमध्ये असलेली जगप्रसिद्ध मोनलिसा पेंटींग जगातल्या सर्वात रहस्यमय, महागड्या आणि चर्चीत पेंटींगपैकी एक आहे. या पेंटींगबाबत आतापर्यंत सर्वात जास्त लिहिलं गेलं, वाचलं गेलं आणि रिसर्च केला गेला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आज या पेंटींगची किंमत ८६७ मिलियन डॉलर आहे. भारतीय करन्सीनुसार साधारण ६.४ हजार कोटी रूपये. 2 / 9ही पेंटींग आजपासून साधरण ५०० वर्षआधी प्रसिद्ध पेंटर लिओनार्दो दा विन्चीने बनवली होती. लिओनार्दो दा विन्चीने ही पेंटिंग १५०३ मध्ये बनवायला सुरूवात केली होती. नंतर ही पेंटिंग पूर्ण व्हायला १४ वर्षांचा कालावधी लागला होता. जेवढी या पेंटींगच्या सौदर्याबाबत चर्चा होते, तेवढीच चर्चा या पेंटींगच्या चोरी होण्याबाबतही होते. २१ ऑगस्ट १९११ ला मोनालिसाची ही पेंटींग चोरी गेली होती. दोन वर्षापेक्षा अधिक काळाने ११ डिसेंबर १९१३ ला ही पेंटींग पुन्हा सापडली होती.3 / 9ऑगस्ट १९११ मद्ये म्युझिअममद्ये ठेवलेल्या सर्व पेंटींगवर काचेची फ्रेम आणि इतर आर्टवर्क केलं जात होतं. या कामासाठी अनेक कारागिर लावण्यात आले होते. हे काम करण्यासाटी पेंटींग्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जात होत्या. 4 / 9अशात मोनालिसाची पेंटींग कुणीतरी गायब केली आणि लोकांना समजलं सुद्धा नाही. प्रत्येकाला वाटलं की, पेंटींग एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ठेवली आहे. जेव्हा पेंटींग शोधली गेली तेव्हा सापडली नाही. काही वेळातच हे समोर आलं की, पेंटींगची चोरी झाली आहे.5 / 9पोलिसांना अपेक्षा होती की, पेंटींग चोरी करणारा फोन करून पैशांची मागणी करेल. पण असं झालं नाही. यानंतर पोलिसांनी काही टीम तयार केल्या आणि पेंटींगला शोधणं सुरू केलं. चोर इतका हुशार होता की, त्याने फार कमी पुरावे सोडले होते. ज्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. 6 / 9तपास करत असताना म्युझिअमच्या पायऱ्यावर दरवाज्याचा नॉब, लाकडाची फ्रेम आणि काचेचा तुकडा सापडला. चौकशीत एका प्लंबरने सांगितलं की, त्याने दरवाज्याचा नॉब उघडण्यासाठी एका व्यक्तीची मदत केली होती. यानंतर लाकडाच्या फ्रेमवरील फिंगर प्रींटसोबत तिथे उपस्थित लोकांचे फिंगरप्रिंट मॅच केले. पण कुणाचेही फिंगरप्रिंट मॅच झाले नाही7 / 9त्यानंतर पोलिसांनी मोनालिसाच्या पेंटींगचे ६ हजार पोस्ट लोकांमध्ये वाटले ७ सप्टेंबरने पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. त्याने सांगितलं की, मोनालिसाची पेंटींग प्रसिद्ध पेंटर पाब्लो पिकासोने चोरी केली. पण त्यांच्याकडे काही सापडलं नाही. 8 / 9दोन वर्ष या चोरी प्रकरणी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. अशात फ्लोरेंसमध्ये एका आर्ट डीलरला एक लेटर आलं होतं. हे लेटर विन्सेन्जो नावाच्या एका व्यक्तीने पाठवलं होतं. ज्यात लिहिलं होतं की, त्याच्याकडे मोनालिसा पेंटींग आहे.9 / 9डीलरने ही पेंटींग खरेदी करण्यासाठी एका हॉटेलमध्ये मींटिंग ठेवली होती. विन्सेन्जो जेव्हा पेंटींग घेऊन तिथे पोहोचला तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. विन्सेन्जो म्युझिअममध्ये पेटींगंमध्ये काच लावण्याचं काम करत होता. काच लावण्यादरम्यान त्याने मोनालिसाची पेंटींग चोरी केली होती. विन्सेन्जोला पेंटींग चोरी करण्याच्या आरोपात १५ महिन्यांची शिक्षा झाली होती. पण तो ७ महिन्यांनीच सुटून आला होता.