शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 12:04 IST

1 / 11
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी असलेले बिल गेट्स यांनी पत्नी मेलिंडापासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. २७ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघेही आता वेगळे होणार आहेत. अशात त्यांची भेट कशी झाली? कुणी कधी आणि कसं प्रपोज केलं? हे जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे. चला जाणून घेऊ कशी होती त्यांची लव्हस्टोरी.....
2 / 11
एका मुलाखतीत मेलिंडा यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, कशाप्रकार बिल गेट्स यांनी त्यांना एका शनिवारी सकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये प्रपोज केलं होतं आणि त्यांनी नकार दिला होता.
3 / 11
मेलिंडाने म्हणाल्या होत्या की, 'त्यांचं आमंत्रण फारच सम्मोहित कऱणारं होतं. त्यांनी मला दोन आठवड्यानंतर डीनरला जाण्याचा प्लॅन केला होता. त्यांनी मला डीनरला जाण्यासाठी विचारलं होतं. मी त्यांना म्हणाले होते की, हे माझ्या फार सहज नाही'.
4 / 11
त्यावेळी त्यांनी आपला नंबर बिल गेट्स यांना दिला होता आणि म्हणाल्या होत्या की, जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा सांगा. बिल गेट्स यांनी त्याच रात्री मेलिंडा यांना फोन केला. त्यानंतर दोघांचं नातं पुढे सरकलं. मेलिंडा म्हणाल्या होत्या की, त्यांच्या आईला हे आवडलं नव्हतं. कारण बिल हे कंपनीचे सीईओ होते. तसेच ते जगातले सर्वात लोकप्रिय बॅचलर होते. त्यावेळी मेलिंडा या मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होत्या.
5 / 11
फोर्ब्समध्ये कारोलिन होवार्डला दिलेल्या एका मुलाखतीत बिल गेट्स यांनी सांगितले होते की, मेलिंडा यांनी मोठ्या मेहनतीनंतर अखेर पहिल्या डेटसाठी होकार दिला होता. मेलिंडा गेट्स यांनी बिल यांना त्यांच्याबाबत सांगितलं. ज्यांच्यासोबत त्यांनी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सची डिग्री घेतली होती.
6 / 11
मेलिंडा म्हणाल्या की, 'मी अनेक लोकांसोबत काम केलं. कॉलेजमध्ये माझ्यासोबत अनेक हुशार लोक होते. यात काही महिला होत्या. जेव्हा मी मागे वळून पाहते तर वाटतं की, बिल त्या लोकांपैकीच एक आहेत ज्यांच्यासोबत मी कॉलेजमध्ये बोलत होते. माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर होता. तेही माझा सन्मान करत होते. मी त्यांच्या तल्लख बुद्धीकडे आकर्षित झाले होते. तसेच ते फार गमतीदार आहेत. मला या गोष्टी आवडू लागल्या होत्या. हा काही फार लवकरच सुरू झालेला रोमान्स नव्हता. आम्ही सात वर्ष एकमेकांना डेट केलं त्यानंतर लग्न केलं.
7 / 11
त्या म्हणाल्या की, जेव्हा आम्ही सोबत काम सुरू केलं तेव्हा आम्ही एकसारखं काम करत नव्हतो. मी मायक्रोसॉफ्टमध्ये खालच्या स्तरावर होते आणि ते कंपनीचे सीईओ होते. आम्हा दोघांना एका लेव्हलवर येण्यासाठी बदलावं लागलं. हे इतकं सोपं नव्हतं की, रातोरात होईल. मात्र, आम्ही दोघांनी त्यावर काम केलं.
8 / 11
बिल गेट्स म्हणाले होते की, 'मी नेहमीच सगळंकाही केलं आहे. मला नेहमी एक साथीदार मिळाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सुरूवातीच्या दिवसात एक पॉल एलेन होते. त्यांनीच मला काही करण्याची आयडिया दिली होती. त्यानंतर स्टीव बालमेर भेटले. त्यांच्यासोबत कॉलेज दरम्यान भेट झाली. आता फाउंडेशनमध्ये माझ्यासोबत मेलिंडा आहे.
9 / 11
कंपनीच्या पार्किंगमध्ये मेलिंडा यांनी नकार दिल्यावर बिल गेट्स यांनी हार मानली नाही. त्यांनी मेलिंडा यांना डीनरसाठी पुन्हा विचारणा केली. त्यानंतर हळूहळू ते जवळ आले. काही महिन्यात दोघे सोबत होते. १९९३ मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि नंतर १९९४ मध्ये दोघांनी लग्न केलं.
10 / 11
१९९० मध्ये मेलिंडा यांना मायक्रोसॉफ्टमध्ये जनरल मॅनेजर करण्यात आलं होतं. या पदावर त्या १९९६ पर्यंत होत्या. त्यानंतर त्यांनी फ्रमिली वाढवण्याचा प्लॅनिंग केलं. तेव्हा त्यांनी मायक्रोसॉफ्ट सोडली.
11 / 11
१९९० मध्ये मेलिंडा यांना मायक्रोसॉफ्टमध्ये जनरल मॅनेजर करण्यात आलं होतं. या पदावर त्या १९९६ पर्यंत होत्या. त्यानंतर त्यांनी फ्रमिली वाढवण्याचा प्लॅनिंग केलं. तेव्हा त्यांनी मायक्रोसॉफ्ट सोडली.
टॅग्स :Bill Gatesबिल गेटसInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टInternationalआंतरराष्ट्रीयDivorceघटस्फोट