Man complains pain : महिना झाला पोटात दुखत होतं; शेवटी दवाखान्यात गेला; अन् डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला ५९ फूटांचा किडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 19:31 IST
1 / 6पोटात दुखणं ही सामान्य समस्या आहे. सगळ्यांचा गॅस, अपचन काहीही झालं तरी पोटात दुखतं. पण पोटात दुखणं एका माणसाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. एका ६७ वर्षीय माणसाच्या पोटात वेदना होत होत्या. 2 / 6त्यानंतर या माणसाच्या पोटातून तब्बल ५९ फूटांचा किडा डॉक्टरांनी काढला आहे. मागच्या बाजूने हा किडा काढण्यात आला असून हे प्रकरण पाहून डॉक्टरही अवाक् झाले आहेत. 3 / 6हा प्रकार थायलँडच्या नोंगखाई प्रदेशातील आहे. द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार या माणसाला गेल्या काही दिवसांपासून या समस्येचा सामना कराव लागत होता. पोटदुखी थांबत नाहीये म्हटल्यावर या माणसानं डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासणीनंतर असं काही बाहेर येईल याची कल्पनाही त्याला नव्हती. 4 / 6थायलँडच्या नोंगखाईमद्ये पॅरासिटीक डिजीज रिचर्स सेंटरमध्ये जाऊन या माणसानं तपासणी करून घेतली. त्यावेळी प्रायव्हेट पार्टमध्ये एक परजीवी किडा असल्याचं दिसून आलं. १८ मीटरपेक्षा जास्त लांबीचा हा किडा होता. 5 / 6रिपोर्ट्सनुसार डॉक्टरांनी सांगितले की, कच्च मांस खाल्यामुळे हा किडा पोटात शिरतो. ३० वर्षांपेक्षा जास्तकाळ हा किडा माणसाच्या शरीरात राहू शकतो. 6 / 6या माणसाच्या शरीरातील किडा मात्र बराच मोठा होता. जवळपास ५९ फूट लांब असल्यांचे डॉक्टरांनी सांगितलं. सगळ्यात आधी रुग्णाला औषध देण्यात आलं. त्यानंतर मागच्या बाजूनं गा किडा काढण्यात आला. हा किडा काढण्यासाठी बराच वेळ लागला. सध्या या रुग्णांची अवस्था खूप नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.