शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे असं कसं घडतं?; ८१ वर्षापासून 'या' व्यक्तीने केलाय अन्न-पाण्याचा त्याग, तरीही ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 15:57 IST

1 / 5
या जगात असे बरेच रहस्यमय लोक राहतात ज्यांची कहाणी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसत असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बाबांबद्दल सांगणार आहोत. जर कोणी 4 ते 5 तास उपाशी राहत असेल तर त्या माणसाची प्रकृती ढासळते
2 / 5
ज्या बाबाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यांनी गेल्या 81 वर्षांपासून काहीही खाल्लेले नाही. होय… त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतकी वर्षे जेवण न केल्यानंतरही बाबांची प्रकृती ठणठणीत आहे.
3 / 5
गुजरातच्या अंबाजी जवळच्या जंगलात राहणारे प्रल्हाद जानी हे अंबामाताचे भक्त आहे. प्रल्हाद भाई गेल्या कित्येक वर्षांपासून काहीही न खाता देवीची उपासना करण्यात मग्न आहेत. सुरुवातीपासूनच बाबांना आई अंबाचा आशीर्वाद आहे असं सांगण्यात येतं. वयाच्या 12 वर्षांपासून त्यांनी काही खाल्ल नाही अन् त्यांना कधी भूक लागत नाही.
4 / 5
ते म्हणतात की, 'आई दुर्गाने मला वरदान दिलं आहे, म्हणून मला भूक लागणार नाही आणि मला तहान लागणार नाही.
5 / 5
त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटलमधील न्यूरो सर्जन डॉ. सुधीर शहा यांनीही एक चाचणी केली. ज्यामध्ये त्यांनी प्रह्लाद भाईला एका खोलीत १५ दिवस नजरकैदेत ठेवलं. तेव्हाही ते स्पष्ट झालं की प्रल्हादभाई काही न खाताही ठणठणीत आहेत.
टॅग्स :Gujaratगुजरातfoodअन्नHealthआरोग्य