शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 3:49 PM

1 / 7
सोशल मीडियावर सध्या एका सुंदर दिसणाऱ्या मॉडेलने धुमाकूळ घातला आहे. इमा असं या जपानी मॉडेलचं नाव असून तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भूरळ पाडली आहे.
2 / 7
इमा ही मॉडेल खरी नसून संगणकाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. सीजी मॉडलिंग कंपनीने इमा ही मॉडेल तयार केली असून ती हुबेहुब जिवंत व्यक्तीप्रमाणेच भासते.
3 / 7
तंत्रज्ञानाच्या मदतीने ही मॉडेल तयार करण्यात आली आहे. इमाचे फोटो सध्या सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहेत.
4 / 7
सोशल मीडियावर इमाचे 15 हजाराहून अधिक फॉलोअर्स असून जपानमध्ये फक्त या मॉडेलच्याच नावाची चर्चा आहे.
5 / 7
इमाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे सीजी वर्ल्ड मॅगझिनच्या फेब्रुवारी एडिशनच्या कव्हर पेजवर तिला स्थान देण्यात आले आहे.
6 / 7
3D टेक्नॉलॉजीच्या मदतीने 2018 मध्ये इमा ही मॉडेल तयार करण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये इमा अत्यंत लोकप्रिय झाली आहे.
7 / 7
तंत्रज्ञानाच्या मदतीने याआधी अनेक व्हर्चुअल मॉडेल तयार करण्यात आल्या आहेत. मात्र इमा ही आतापर्यंतची सर्वात प्रसिद्ध मॉडेल ठरली आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानJapanजपान