भारतातील एकमेव रेल्वे ज्यासाठी काढावं लागत नाही तिकीट, ७५ वर्षापासून सुरू आहे मोफत सेवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:02 IST
1 / 7The Bhakra-Nangal train: आजकाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकणी जाण्यासाठी भाडं द्यावंच लागतं. रेल्वेनं प्रवास करण्यासाठीही तिकीट काढावं लागतं. अशात मोफत प्रवास करता येणाऱ्या रेल्वेबाबत कल्पना करणं शक्यच नाही. मात्र, भारतात एक अशी रेल्वे आहे जी गेल्या ७५ वर्षांपासून मोफत सेवा देत आहे. महत्वाची बाब म्हणजे ही रेल्वे रेल्वे विभागाची नाही.2 / 7रेल्वेनं प्रवास करण्यासाठी तिकीट किंवा रिजर्व्हेजनची गरज लागते. विना तिकीट रेल्वेनं प्रवास केल्यास दंड भरावा लागू शकतो किंवा तुरूंगाची हवा खावी लागू शकते. पण भारतात एक अशी रेल्वे चालते ज्यात ना टीसी असतो आणि ना तिकीट खरेदी करण्याची गरज असते. चला जाणून घेऊ कुठे धावते ही रेल्वे आणि मोफत का चालवली जाते.3 / 7भाखडा-नंगल असं या रेल्वेचं नाव आहे. ही रेल्वे पहिल्यांदा १९४८ मध्ये धावली होती. याचा उद्देश भाखडा-नंगल धरण निर्माण कार्यामध्ये मजूर आणि आवश्यक साहित्य पोहोचवण होता. पण कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण झाल्यावर सुद्धा ही रेल्वे सुरू ठेवण्यात आली. जेणेकरून स्थानिक लोकांना मोफत प्रवास करता यावा. हे धरण भारतातील सगळ्यात उंच धरणांपैकी एक आहे.4 / 7हे रेल्वे पंजाबच्या नंगलपासून ते हिमाचल प्रदेशच्या भाखडापर्यंत १३ किलोमीटरचं अंतर धावते. या छोट्याशा प्रवासात रेल्वे तीन भुयारातून जाते आणि सहा स्टेशनवर थांबते. खास बाब म्हणजे प्रवासादरम्यान प्रवासी सतलज नदी आणि शिवालिक डोंगरांचा नजारा बघू शकतात.5 / 7तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येत नाही. ही रेल्वे भाखडा ब्यास मॅनेजमेंट बोर्डकडून चालवली जाते. बोर्डानं ही रेल्वे मोफत चालवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून भाखडा-नंगल डॅम निर्माणाचं ऐतिहासिक महत्व जिवंत रहावं.6 / 7रेल्वे चालवण्यासाठी १० ते २० लीटर डिझेल प्रति तास इतकं लागतं. तरीही बोर्डानं यात प्रवास करण्यासाठी तिकीट सुरू केलं नाही. हा निर्णय स्वातंत्र्यानंतर भारताची औद्योगिक प्रगतीला सन्मान देण्याचा आणि स्थानिक लोकांना सुविधा देण्यासाठी घेतला गेला. 7 / 7सुरूवातीला ही रेल्वे स्टीम इंजिनावर चालत होती. पण १९५३ मध्ये यात डिझेल इंजिन लावण्यात आलं. या रेल्वेत असलेले लाकडाचे कोच पाकिस्तानच्या कराचीमध्ये बनले होते आणि जे आजही रेल्वेला लागले आहेत.