महाराष्ट्रातील व्यक्तीचं अचानक उजळलं भाग्य, दुबईत मिळाले तब्बल 75000000 रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 03:43 PM2021-07-19T15:43:43+5:302021-07-19T15:47:53+5:30

Dubai Duty Free Millennium Millionaire draw: ठाण्यातील गणेश शिंदे नावाच्या व्यक्तीनं संयुक्त अरब अमीरात(UAE) मधील एक लॉटरी जिंकून एक मिलियन डॉलर म्हणजेच, तब्बल 75000000 रुपये जिंकले आहे.

मुंबई: हिंदीत म्हटलं जातं, 'ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़ के देता.' अशीच एक घटना ठाण्यातील गणेश शिंदे नावाच्या नाविकासोबत घडली आहे. गणेश यांनी संयुक्त अरब अमीरात(UAE) मधील एक लॉटरी जिंकून एक मिलियन डॉलर म्हणजेच, तब्बल 75000000 रुपये जिंकले आहे. ही लॉटरी जिंकणारे ते 181वे भारतीय नागरिक ठरले आहेत.

ठाण्यातील 36 वर्षीय गणेश शिंदे ब्राझीलमधील एका कंपनीत काम करतात.

काही कामानिमित्त दुबईला येत असताना 16 जून रोजी दुबई ड्यूटी-फ्री मिलेनियम मिलियनेयर वेबसाइटवरुन लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं.

यूएईमध्ये दाखल होताच त्यांना आनंदाची बातमी मिळाली. त्यांनी या लॉटरीमध्ये तब्बल 1 मिलियन डॉलर जिंकले.

शिंदे मागील दोन वर्षांपासून मिलेनियम मिलियनेयरचे तिकीट खरेदी करायचे. दोन वर्षानंतर त्यांचं भाग्य उजळलं.

गल्फ न्यूजशी बातचीत करताना शिंदे म्हणाले की, मी लॉटरी जिंकली आहे, याचा मला अजूनही विश्वास बसत नाही. मी दुबई ड्यूटी-फ्रीसाठी खूप आनंदी आहे आणि त्यांचे आभारही मानतो.

प्रसिद्ध ड्यूटी-फ्रीचा लकी ड्राची सुरुवात 1999 मध्ये झाली होती.

या लकी ड्रॉमध्ये आतापर्यंत 181 भारतीय नागरिकांनी 1 मिलियन डॉलर आणि इतर नगदी पुरस्कार जिंकले आहेत.