शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' गावात एक आठवडा कपड्यांविना राहते नवरी, नवरदेवासाठीही असतात नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:27 IST

1 / 7
Marriage Weird Rituals : भारतातील प्रत्येक राज्यात लग्नासंबंधी वेगवेगळे रितीरिवाज असतात. कुठे नवरी-नवरदेवाला एका रूममध्ये बंद करण्याची परंपरा आहे, तर कुठे नवरीला उचलून नेण्याची परंपरा. पण भारतातील लग्नाच्या एका अशा रिवाजाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल...
2 / 7
भारतात लग्न खूप धडाक्यात केलं जातं. मजा-मस्ती, डान्स-गाणं यासोबत लग्न एन्जॉय केलं जातं. अनेक दिवस लग्नाचे रितीरिवाज चालू असतात. प्रत्येक धर्माची आपली एक वेगळी परंपरा असते, जी लग्नाला खास बनवते.
3 / 7
आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे लग्नानंतर नव्या नवरीला पहिल्या आठवड्यात कपड्यांविना रहावं लागतं. यादरम्यान पती-पत्नी एकमेकांसोबत गंमत करू शकतात, पण त्यांना वेगळं ठेवलं जातं. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे आणि आजही कायम आहे. लग्नासंबंधी ही परंपरा अजब वाटू शकते. पण येथील लोक याला त्यांची संस्कृती आणि मान्यतेचा भाग मानतात.
4 / 7
हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटातील पिणी गावात ही परंपरा आजही पार पाडली जाते. या गावात लग्नानंतर नवरीला पूर्ण एक आठवडा कपड्यांविना रहावं लागतं. अंगावर फक्त उलनपासून तयार पट्टे घालू शकते.
5 / 7
केवळ नवरीच नाही तर नवरदेवालाही काही खास नियम पाळावे लागतात. अनेक वर्षांपासून हीच परंपरा या गावातील लोक पाळतात.
6 / 7
ही परंपरा पिणी गावात श्रावणात पाच दिवस पार पाडल्या जाणाऱ्या रिवाजासोबत मिळती जुळती आहे. या पाच दिवसांमध्ये गावातील महिला कपड्यांविना राहतात. तर पुरूषांना दारू पिण्याची मनाई असते. त्याचप्रमाणे लग्नानंतर एक आठवडाही नवरदेवाला दारू पिण्याची मनाई असते.
7 / 7
गावात अशी मान्यता आहे की, जर नवरी-नवरदेव योग्यपणे या परंपरेचं पालन केलं तर त्यांना सौभाग्य प्राप्त होतं आणि त्यांचं वैवाहिक जीवन आनंदी जातं. अनेक वर्षांपासून ही परंपरा पार पाडली जाते आणि आजही पाळली जाते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न