शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतात किती असू शकते ट्रॅफिकपासून वाचवणाऱ्या एअर टॅक्सीची किंमत, किती असेल भाडं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:37 IST

1 / 7
भारताच्या मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक जॅम ही लोकांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी बनली आहे. रोज ऑफिसला जाणं असो, एखाद्या इव्हेंटला जाणं असो किंवा मिटिंगला जाणं असो, रस्त्यांवर तासन्‌तास अडकणं आता सामान्य झालं आहे. याच समस्येवर उपाय म्हणून एअर टॅक्सी ही संकल्पना पुढे येत आहे.
2 / 7
एअर टॅक्सी ही एक प्रकारची इलेक्ट्रिक उडणारी टॅक्सी आहे, जी हेलिकॉप्टरप्रमाणे वर-खाली उड्डाण करू शकते, पण हेलिकॉप्टरपेक्षा कमी आवाज, कमी खर्च आणि अधिक सुरक्षित मानली जाते. भारतात ही सेवा आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. अशात एअर टॅक्सीचं भाडं किती असू शकतं आणि ती खरेदी करण्यासाठी किती पैसे लागतील.
3 / 7
भारताची पहिली Made in India एअर टॅक्सी The ePlane Company तयार करत आहे. ही कंपनी IIT मद्रासशी संलग्न असलेली एक स्टार्टअप आहे. याशिवाय IndiGo आणि अमेरिकन कंपनी Archer Aviation मिळूनही भारतात एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहेत.
4 / 7
अंदाज आहे की 2027 च्या सुरुवातीला पहिली कमर्शियल एअर टॅक्सी उड्डाण सुरू होईल. सुरुवातीला दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अर्थातच एअर टॅक्सीचे भाडे सामान्य टॅक्सी किंवा कॅबपेक्षा जास्त असेल, पण वेळेची मोठी बचत होत असल्यामुळे लोक हा पर्याय निवडू शकतात.
5 / 7
उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये कनॉट प्लेस ते गुरुग्राम हा प्रवास रस्त्याने सुमारे 90 मिनिटांचा असतो, पण एअर टॅक्सीने तो फक्त 7 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. यासाठी अंदाजे 2,000 ते 3,000 रुपये भाडे असू शकते.
6 / 7
बेंगळुरूमध्ये एअरपोर्ट ते शहर असा एअर टॅक्सीचा प्रवास 1,500 ते 1,700 रुपये प्रति ट्रिप असण्याची शक्यता आहे. इतर मोठ्या शहरांमध्ये अंतर आणि रूटनुसार हे भाडे 2,000 ते 6,000 रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. एकूणच, एअर टॅक्सीचे दर Uber Black किंवा इतर लक्झरी कॅब सेवांप्रमाणे असतील, जिथे लोक जास्त पैसे देऊन जलद आणि आरामदायी प्रवास निवडतात.
7 / 7
अंदाजानुसार, एका एअर टॅक्सीची किंमत सुमारे 2.5 कोटींपासून 10 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. प्रारंभीचे परदेशी मॉडेल्स सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपये दरम्यान असू शकतात, तर भारतात तयार होणाऱ्या प्रगत eVTOL विमानांची किंमत 7 ते 10 कोटी रुपये इतकी जाऊ शकते.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके