शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील बॉयो टॉयलेट कसं काम करतं...कुठे रिकामं करतात? सिस्टीम अशी ज्याचा विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:46 IST

1 / 7
Railway Bio Toilet Facts : आपल्याला आठवत असेल की, काही वर्षांआधीपर्यंत रेल्वेच्या टॉयलेटमधील वेस्ट थेट रेल्वे ट्रॅकवर पडत होतं. ज्यामुळे ट्रॅकवर खूप अस्वच्छता राहत होती. त्यानंतर रेल्वेने नवीन आधुनिक टॉयलेट लावले. ज्याना Bio-Toilet म्हणतात. पण यांबाबत लोकांच्या मनात प्रश्न येतात की, टॉयलेटमधील वेस्ट जातं कुठे? आपण कल्पनाही केली नसेल की, रेल्वेच्या टॉयलेटमधील वेस्टचं पाणी बनतं आणि ते पुन्हा वापरलं जातं. चला तर पाहुयात बायो टॉयलेटची सिस्टीम कशी काम करते.
2 / 7
आधी जेव्हा रेल्वे स्टेशनवर थांबत होती, तेव्हा लोकांना सांगितलं जायचं की, रेल्वे स्टेशनवर थांबलेलील असताना टॉयलेटचा वापर करू नका. यासाठी रेल्वेत बोर्डही लावले जात होते. कारण कुणीही टॉयलेट केली की, वेस्ट थेट प्लॅटफॉर्म जात होतं. ज्यामुळे प्रवासी आणि सफाई कर्मचाऱ्यांना अडचण होत होती. सोबतच गंभीर आजार पसरण्याचा धोकाही राहत होता.
3 / 7
ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वेने कंट्रोल्ड डिस्चार्ज सिस्टीम आणली. ज्यामुळे स्थिती काही प्रमाणात सुधारली. कारण कंट्रोल्ड डिस्चार्ज सिस्टीममधून वेस्ट तेव्हाच सोडलं जात होतं, जेव्हा रेल्वे ३० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावत होती. यामुळे स्टेशन साफ राहत होते, ट्रॅकवर घाण होण्याची समस्या जशीच्या तशीच होती.
4 / 7
पुढे ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक फारच क्रांतिकारी पाउल उचललं. ज्यामुळे प्रवास करणं फारच बदललं. DRDO ने भारतीय रेल्वेसोबत मिळून एक अद्भुत टेक्निक विकसित केली. ती म्हणजे बायो टॉयलेट. ही टेक्निक भारतीय रेल्वेसाठी एक गेम- चेंजर ठरली. ज्यामुळे स्वच्छतेची मानकं पूर्णपणे बदलली. हे टॉयलेट रेल्वेत वापरले जाऊ लागले, ज्यात ह्यूमन वेस्ट पूर्णपणे डीकंपोज करण्याची क्षमता होती.
5 / 7
बायो-टॉयलेटमध्ये मानवी मल - मूत्र एका विशेष चेंबरमध्ये जमा होतं, ज्यात काही खासप्रकारचे बॅक्टेरिया असतात. ज्याना एनारोबिक बॅक्टेरिया म्हणतात. हे बॅक्टेरिया ह्यूमन वेस्टला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडतात आणि त्याचं रूपांतर पाणी व बायोगॅसमध्ये करतात. ही पूर्ण प्रक्रिया कोणत्या दुर्गंधीशिवाय होते. त्यामुळे आजूबाजूचं वातावरण स्वच्छ राहतं.
6 / 7
या प्रक्रियेदरम्यान सॉलिड वेस्ट चेंबरच्या खालच्या भागात जमा होतं, जे नंबर काढून त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाते. तर शुद्ध पाणी जे वेस्टपासून तयार होतं, ते फिल्टर करून पु्न्हा वापरलं जाऊ शकतं. या टेक्निकमुळे पाण्याचं संरक्षण देखील होतं आणि पर्यावरणावर पडणारा नकारात्मक प्रभावही कमी होतो.
7 / 7
सध्या सगळ्याच रेल्वेत बायो टॉयलेट नाहीत. पण सगळ्यात रेल्वेत बायो टॉयलेट लावण्याचं रेल्वेचं लक्ष्य आहे. २०३० पर्यंत भारतीय रेल्वेला पूर्णपणे 'ग्रीन रेल्वे' बनवण्याची योजना आहे. काही रिपोर्ट्सनुसार आतापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त कोचमध्ये बायो टॉयलेट लावण्यात आले आहेत.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके