शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

५ हजार किलोची सोन्याची मुर्ती माहीत आहे का? जाणून घ्या रहस्यमय मुर्तीबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 15:57 IST

1 / 10
जगभरातील अनेक देशांमध्ये बुद्धाच्या मुर्ती आहेत. काही ठिकाणी इतक्या जुन्या मुर्ती आहेत की, या मुर्ती कधी तयार करण्यात आल्या याबाबत कोणालाही माहिती नाही. जगातील सगळ्यात मोठी बुद्धाची मुर्ती चीनच्या दक्षिण पश्चिमी सिचुआन प्रांतांत आहे. ही मुर्ती तयार करण्यासाठी ९० वर्षांपेक्षा जास्त वर्षाचा कालावधी लागला होता.
2 / 10
दगडाच्या या भव्य मुर्तीला तयार करण्याची सुरुवात तांग वंश (६१८-९०७) काळात ७१३ मध्ये झाली होती. तुम्हाला जगातल्या सगळ्यात मोठ्या बुद्धाच्या मुर्तीबाबत माहीत आहे का? या मुर्तीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. आज आम्ही तुम्हाला याच मुर्तीबाबत सांगणार आहोत.
3 / 10
बुद्धाच्या या मुर्तीला 'द गोल्डन बुद्धा' असं म्हटलं जातं. ही मुर्ती थायलँडची राजधानी बँकॉकमध्ये 'वाट ट्रेमिट' मध्ये आहे. ९.८ फूट लांब असलेल्या मुर्तीचं वजन ५ हजार ५०० किलोग्राम आहे. ही मुर्ती सोन्याची असल्यामुळे सोन्याच्या हिशोबाने अंदाज लावल्यास या मुर्तीची किंमत १९ अरब रुपयांच्या आसपास असेल.
4 / 10
अनेक वर्षांपर्यंत जगभरातील लोकांना या मुर्तीबाबत कल्पना नव्हती. साधारणपणे १९५४ पर्यंत लोकांना या मुर्तीबाबत कल्पना नव्हती. कारण त्यावेळी या सोन्याच्या मुर्तीवर प्लास्टर चढवण्यात आलं होतं. प्रतिमा ठेवण्यासाठी मंदिरात एक भव्य भवन तयार करण्यात आलं.
5 / 10
१९५५ मध्ये या मुर्तीचं स्थलांतर केलं जातं होतं. त्यावेळी चुकून लोकांच्या हातून ही मुर्ती जमिनीवर पडली त्यानंतर मुर्तीचं प्लास्टर निघालं. त्यावेळी या मुर्तीची खासियत लोकांसमोर आली. त्यानंतर भगवान बुद्धाच्या सोन्याच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.
6 / 10
या सोन्याच्या मुर्तीची चोरी होऊ नये म्हणून प्लास्टर करण्यात आलं, असं मानलं जातं. १७६७ मध्ये आक्रमणाच्या आधी या मुर्तीवर प्लास्टर करण्यात आलं होतं.
7 / 10
ही मुर्ती कधी तयार झाली याबाबत कोणालाही माहिती नाही पण १३ व्या आणि १४ व्या शतकात सुखोथाई राजवंशाच्या शैलीत ही मुर्ती तयार करण्यात आली होती. असं मानलं जातं. या मुर्तीचे डोकं वेगळ्याच आकारात असल्यामुळे सुशोथाई काळात निर्माण झाल्याचं समजलं जातं.
8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :Jara hatkeजरा हटके