शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

असंही नशीब! ज्या दिवशी गर्लफ्रेन्ड गेली सोडून पठ्ठ्याला त्याच दिवशी लागली कोट्यावधी रूपयांची लॉटरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 13:44 IST

1 / 10
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरात राहणारा जॉन फार निराश होता. त्याला कारणही तसंच होतं. त्याची गर्लफ्रेन्ड त्याला सोडून गेली होती. जॉन गर्लफ्रेन्ड सोडून गेल्याचा दु:खात होता. अशातच त्याचे त्याचे डोळे आनंदाने चमकले.
2 / 10
कारण गर्लफ्रेन्ड सोडून गेल्यावर जॉनला काही तासातच ३ मिलियन पाउंड म्हणजे ३० कोटी रूपयांची लॉटरी लागली. जॉन ही लॉटरी लागल्यावर इतका आनंदी झाला की, तो इतका खूश झाला की आता गर्लफ्रेन्डला एक फ्रीज गिफ्ट करणार आहे.
3 / 10
आयविटनेस न्यूजच्या रिपोर्टनुसार, जॉन ३० कोटी रूपयाची लॉटरी लागल्यावर इतका आनंदी झाला की त्याला स्वत:ला शांत करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करावी लागली. (Image Credit : hispotion.com)
4 / 10
फायनान्स सेक्टरमध्ये काम करणारा जॉन १९ जानेवारीला नॅशनल लॉटरी ऑपरेटर ऑफिसमध्ये गेला होता. जेणेकरून जिंकलेले पैसे मिळवावे. त्याने १५ जानेवारीला ही लॉटरी जिंकली होती आणि त्याच दिवशी त्याची गर्लफ्रेन्ड त्याला सोडून गेली होती.(Image Credit : elitedaily.com)
5 / 10
जॉन म्हणाला की, 'मला तर विश्वासच बसत नाहीये की, मी इतके पैसे जिंकले आहेत. आतापर्यंत मी लॉटरीतून केवळ २३०० रूपये जिंकलो होतो. माझी लिव इन गर्लफ्रेन्ड माझ्यापासून वेगळी झाली आहे आणि मी फार टेन्शनमध्ये होतो.
6 / 10
'शुक्रवारी रात्री मी लॉटरीचा रिझल्ट पाहिला. त्यावेळी मी एकटा पडलो होतो. गर्लफ्रेन्डही गेली होती. जेव्हा मी पाहिलं की, मी लॉटरी जिंकलो तर मला वाटलं मी स्वप्न बघतोय'.
7 / 10
तो म्हणाला की, 'लॉटरीचा रिझल्ट पाहिल्यावर मी लगेच थंड पाण्याने आंघोळ केली आणि परत येऊन पुन्हा रिझल्ट चेक केला. मी जिंकलो होतो. पण हे माझ्या गर्लफ्रेन्डसाठी भाग्यशाली नाही ठरलं'.
8 / 10
इतके पैसे जिंकल्यावर आता जॉन रिटायर होण्याचा विचार करत आहे. तो म्हणाला की, तो गुंतवणूक करणे आणि लोकांना दान करणे यावर फोकस करणार आहे. Image Credit : bonobology.com)
9 / 10
जॉन म्हणाला की, तो हे निश्चित करेल की, त्याला या पैशातून नियमित कमाई मिळेल आणि व्याजही येत राहील.
10 / 10
तो म्हणाला की, तो यातून त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डसाठी एक फ्रीज आणि वॉशिंग मशीन खरेदी करेल. आणि हेही सांगेल की, त्याच्या मनात तिच्याबाबत काहीच वाईट नाहीये.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय