शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात वेगवान ट्रेन, कमाल स्पीड ताशी 600 किलोमीटरपेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 18:23 IST

1 / 9
नवी दिल्ली : आशिया हे जगातील सर्वात वेगवान ट्रेनचे घर आहे. येथील ट्रेनची कमाल स्पीड ताशी 600 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. म्हणजेच, जर तुम्हाला दिल्ली ते पाटणा हे अंतर कापायचे असेल, तर तुम्ही हा प्रवास या ट्रेनमधून अगदी आरामात 2 तासांत पूर्ण करू शकता.
2 / 9
दरम्यान, अशा 7 ट्रेनबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा स्पीड जास्त आहे. यातील सर्वात कमी असलेल्या ट्रेनचा स्पीडही ताशी 350 किलोमीटर आहे.
3 / 9
L0 Series - ही ट्रेन जपानच्या मित्सुबिशीने (Mitsubishi) तयार केली आहे. या ट्रेनने चाचणीदरम्यान ताशी 603 किलोमीटरचा स्पीड गाठला आहे.
4 / 9
TGV POS - ही सर्वात वेगवान नॉन मॅग्नेटिक ट्रेन आहे. ट्रेनचा कमाल स्पीड 575 किलोमीटर प्रति तास आहे. जरी ती फ्रान्सद्वारे चालवले जात असती तरी ती जर्मनी ते स्वित्झर्लंडला देखील जोडते.
5 / 9
CRH380A- चीनमधील बीजिंग आणि शांघाय दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनचा कमाल स्पीड ताशी 486 किलोमीटर आहे.
6 / 9
HEMU-430X- ही एक कोरियन ट्रेन आहे, या ट्रेनचा कमाल स्पीड 422 किलोमीटर प्रति तास आहे.
7 / 9
Shanghai Transrapid - शांघायला विमानतळाशी जोडणाऱ्या या ट्रेनचा कमाल स्पीडचा 431 किलोमीटर प्रति तास आहे. मात्र, ती केवळ 250 किमी प्रतितास या सरासरी स्पीडने चालवली जाते.
8 / 9
Fuxing Hao-ही ट्रेन चीनमध्येही धावते. या ट्रेनचा कमाल स्पीड 418 किलोमीटर प्रति तास आहे, परंतु ती साधारणपणे 354 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवली जाते.
9 / 9
Frecciarossa 1000- या इटालियन ट्रेनचा कमाल स्पीड ताशी 394 किलोमीटर आहे. ही ताशी 360 किमी स्पीडने चालवली जाते.
टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटके