शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! पृथ्वीवरील सगळे मनुष्य आहेत एलियन्स, वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:33 IST

1 / 8
एलियन्सबाबत अलिकडे दररोज काहीना काही खुलासे होत असतात. ब्रम्हांडात एलियन्सचं अस्तित्व आहे का? वैज्ञानिक वर्षानुवर्षे याचा शोध घेत आहेत. पण त्यांना अजूनही काही ठोस असे पुरावे सापडले नाहीत. पण दररोज एलियन्सबाबत अभ्यासक वेगवेगळे दावे करत असतात. आता वैज्ञानिकांनी एक अजब आणि हैराण करणारा दावा केला आहे. ते म्हणाले की, पृथ्वीवर जीवन एक दुसऱ्या ग्रहावरून आलं जो पृथ्वीपासून अब्जो किलोमीटर दूर आहे.
2 / 8
आता प्रश्न असा आहे की, एलियन्स आहेत का? मनुष्यांच्या डीएनएमध्ये केमिकल्स ब्लॉक्स आढळून येतात जे पहिल्यांदा एका उल्कापिंडात आढळून आले होते. अब्जो वर्षाआधी हे उल्कापिंड पृथ्वीवर पडलं होतं. यावरून असा संकेत मिळतो की, पृथ्वीवर जीवन दुसरीकडून आलं. तसेच एखाद्या दुसऱ्या ग्रहावरही मनुष्य असू शकतात.
3 / 8
एका मीडिया रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांनी ती कार्बनयुक्त उल्कापिंड, मुर्चिसन, मुर्रे आणि टॅगिश लेकची हायटेक पद्धतीने टेस्ट केली. जपानच्या होक्काइडो यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर यासुहिरो ओबा म्हणाले की, आम्हाला यात न्यूक्लियोबेससहीत नेक जैविक साहित्य आढळून आले. या जैविक गोष्टी मनुष्याच्या जीवनाचे आवश्क ब्लॉक्स आहेत.
4 / 8
या प्रोफेसरांचं मत आहे की, या जैविक गोष्टी उल्कापिंड, धुमकेतू आणि ग्रहांच्या धूळीसोबत चार अब्ज वर्षाआधी पृथ्वीवर आणल्या गेल्या असतील. ते म्हणाले की, आता पृथ्वीवर अंतराळातील मलब्यांचा पाऊस पडत आहे.
5 / 8
यासुहिरो म्हणतात की, अंतराळातून येणाऱ्या कणांमुळे तसेच जैविक गोष्टींचा पृथ्वीवर जीवन विकसित करण्यात महत्वाचा वाटा आहे. त्यांना हा शोध फारच रोमांचक असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, यातून आपल्याला हे समजतं की, जीवनाची सुरूवात कशी झाली.
6 / 8
त्यांनी सांगितलं की, पृथ्वीवर जीवनाचा आधार, डीएनए आणि आरएनएच्या निर्माणासाठी दोन प्रकारचे न्यूक्लियोबेसची गरज असते. ज्यांना पायरीमीडिन आणि प्यूरीन म्हणतात. याआधी केवळ उल्कापिंडांमध्ये प्यूरिन मिळत होतं.
7 / 8
याआधी अशी माहिती समोर आली होती की, नासा एलियन्ससोबत बोलण्याची तयारी करत आहे. नासाने एलियन्सना त्यांच्या भाषेत संदेश पाठवण्याची तयारी केली आहे. ज्यावर वैज्ञानिकांनी कामही सुरू केलं आहे. कॅलिफोर्नियामध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन लेबॉरेटरीमध्ये वैज्ञानिक या प्लानवर काम करत आहेत. ज्याचं नेतृत्व. डॉ. जोनाथन जियांग करत आहेत.
8 / 8
ऑक्सफोर्डच्या वैज्ञानिकांनी नासाच्या या योजनेबाबत इशारा दिला होता. ते म्हणाले की, नासाच्या या प्लानने बाहेरील अंतराळात पृथ्वीचं लोकेशन उघड होऊ शकतं. त्यासोबतच एलियन्सना पृथ्वीवर हल्ल्यासाठी लोकेशनही मिळेल.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेscienceविज्ञान