अल्फा, ब्रावो, डेल्टा....क्रूजवरील या कोडवर्ड्सचा नेमका अर्थ काय? कधी जाल तर माहीत असायला हवेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:06 IST
1 / 7Cruise ship code words: समुद्रात हवेच्या वेगानं धावणारे क्रूज आपण कधीना कधी पाहिले असतीलच. क्रूजवर समुद्रात फिरायला जाण्याची क्रेझ अलिकडे चांगलीच वाढली आहे. अनेक सेलिब्रिटींकडे तर प्रायव्हेट क्रूज असतात. या क्रूजवर इव्हेंट्सची आयोजनही केलं जातं. पण आपल्याला माहीत नसेल की, क्रूजवर काहीही केसेसमध्ये कोडवर्डचा वापर केला जातो. ते नेमके काय असतात हेच आज आपण पाहणार आहोत.2 / 7क्रूजवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं की, क्रूजवर काही सिक्रेट कोडवर्ड असतात. न्यूयार्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, हे कोडवर्ड कधी कधी घाबरवणारेही असू शकतात.3 / 7ब्रिटनमधील क्रूजवर काम करणाऱ्या एका व्यक्तीनुसार, जहाजावर सगळ्यांना ऐकू जाण्यासाठी लाउडस्पीकरवर घोषणा दिल्या जातात. पण यात काही सिक्रेट कोडवर्डही असतात.4 / 7त्यानी पुढे सांगितलं की, जर 'अल्फा' अशी घोषणा होत असेल, ही मेडिकल इमरजन्सी असू शकते. ही घोषणा एखाद्याला इजा झाली असेल किंवा कुणाचा जीव गेला असेल तेव्हा केली जाते.5 / 7त्याशिवाय जर ब्रावो किंवा रेड पार्टी शब्दांचा वापर केला जात असेल तर याचा संबंध आग लागण्याशी असतो. हे शब्द उच्चारले म्हणजे जहाजावर आग लागलीये असं समजा.6 / 7सोबत या व्यक्तीनं सांगितलं की, जर चार्ली कोडचा वापर केला असेल तर याचा अर्थ जहाजाच्या सुरक्षेला धोका आहे असा होतो. जसे की, समुद्री डाकू.7 / 7तेच जर डेल्टा कोड ऐकवला गेला असेल तर याचा अर्थ एखादा विषारी किंवा जैविक धोका आहे. जो जहाजाचं आणि त्यावरील लोकांचं नुकसान करू शकतो.