जोडप्याने अँब्युलन्सचं केलं घर, फोटो पाहुन तुम्ही म्हणाल....नांदा सौख्य भरे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:40 IST
1 / 12एका जोडप्यानं अँब्युलन्स विकत घेऊन त्याचं अत्यंत देखणं घर तयार केलं आहे.2 / 12दोन लाख रुपयांत जुनी अँब्युलन्स विकत घेऊन त्याचा या जोडप्यानं कायापालट केला. 3 / 1242 वर्षांचा मार्क बोनिटो आणि त्याची 36 वर्षांची पार्टनर सोफी यांनी ही कमाल केली.4 / 12या जोडप्यानं 2019 सालच्या मे महिन्यात ही अँब्युलन्स खरेदी केली. 5 / 122 लाख रुपयांत खरेदी केलेल्या या अँब्युलन्सवर त्यांनी आणखी थोडा खर्च करत त्याला घराचं रुप दिलं. या कामासाठी त्यांना २ महिने लागले.6 / 12सोफी स्वतः आरोग्य विभागात रेडिओग्राफर म्हणून काम करते.7 / 12The Sun च्या रिपोर्टनुसार ती जेव्हा मार्कला भेटली, तेव्हा त्याच्याकडं व्हॅन होती. त्यांना ५ मुलं असल्यामुळे ते डेटसाठी याच व्हॅनचा उपयोग करत असत.8 / 12व्हॅनमध्ये स्वयंपाक करणं अवघड जात होतं. त्यामुळेच त्यांनी व्हॅनऐवजी अँब्युलन्स विकत घेण्याचा निर्णय़ घेतला.9 / 12घर असताना अँब्युलन्समध्ये का झोपता, असं लोक त्यांना विचारतात. मात्र आपल्याला अँब्युलन्सच आवडत असल्याचं ते सांगतात.10 / 12अँब्युलन्सच्या आतील बांधकाम मार्कने केलं, तर त्याची सजावट सोफीने केली. या व्हॅनचं नाव फ्लोरेन्स असं ठेवण्यात आलं आहे.11 / 12अँब्युलन्समध्ये टीव्ही, शॉवर, मिनि डेक अशा अनेक सुविधा आहेत. जुन्या फर्निचरचा वापर करून त्यांनी कमी किंमतीत हे सर्व उभं केलं.12 / 12आता कुठल्याही सुंदर जागी जाऊन तिथंच ही अँब्युलन्स पार्क करून आम्ही मजेत राहू शकतो, असं हे जोडपं सांगतं. तर आमच्यापैकी कुणी आजारी पडलं तरी याच व्हॅनमध्ये राहू, असंही सोफी सांगते.