शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता राव? 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत

By manali.bagul | Published: September 30, 2020 8:26 PM

1 / 6
तुमचा विश्वास बसणार नाही पण रस्त्याच्याकडे असलेल्या एका चहा विक्रेत्याकडे तब्बल १ हजार रूपयांना एक कप चहा मिळतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल. या चहामध्ये असं काय आहे म्हणून इतकी जास्त किंमत चहाप्रेमींना मोजावी लागते. हे कोणतंही नाही फाईव्ह स्टार हॉटेल नाही तर पश्चिम बंगालच्या रस्त्यावरील एक चहाचं दुकान आहे. या टपरीवर बसून तुम्ही चहा पिऊ शकता.
2 / 6
न्यूज 18 नं दिलेल्या माहितीनुसार जपानची सिल्वर नीडल व्हाईट टी, आफ्रिकेची कॅरेमेल टी इतकंच नाही तर नायजेरियाची रेड वाईन टी, ऑस्ट्रेलियाई लॅवेंडर असे चहाचे वेगवेगळे प्रकार या टपरीवर उपलब्ध आहेत.
3 / 6
या चहा विक्रेत्याचे नाव पार्थप्रतिम गांगुली आहे. आपल्या चहाच्या प्रेमासाठी यांनी नोकरी सोडून चहाचे दुकान टाकले. या दुकानात जवळपास ११५ वेगवेगळ्या प्रकारची चहा मिळते.
4 / 6
सिल्वर निडिल वाईट टी ची किंमत २ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. कॅमोमाईल टी ची किंमत १४ रुपये प्रति किलो आहे.
5 / 6
पार्थप्रतिम गांगुली यांनी दावा केला आहे की, १००० ते १०० लोक नेहमी त्यांच्या टपरीवर चहा प्यायला देतात. जे लोक पहिल्यांदा चहा पिण्यासाठी येतात. ते फक्त चहाची चव चाखण्यासाठी पुन्हा येतात.
6 / 6
अनेकजण रोज ठरलेल्या वेळेत पार्थ यांच्या चहाच्या दुकानात येतात. काहीजण आधी फोन करून टपरी सुरू आहे की नाही याचा अंदाज घेऊन मग टपरीवर येतात.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके