तरुणाने खडुवर साकारले नरेंद्र मोदी, विरुष्का, सॅन्टाक्लॉज आणि रजनीकांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 19:26 IST
1 / 5एका खडुचं आपण फार फार तर काय करु शकतो. कुणाला तरी फेकून मारु शकतो. मात्र सचिन सांघे या तरुणाने त्याच खडुवर अनेकविध प्रतिमा कोरल्या आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विरुष्काचाही समावेश आहे. अशा इतर अनेक आकृत्या त्याने कोरल्या आहेत.2 / 5सचिनने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांना एक भेटवस्तु दिली. ती लहानशी पण सुंदर आणि सुबक भेटवस्तु होती एक उत्कृष्ट कलाकृती. त्याने एका खडुवर नरेंद्र मोदींची प्रतिमा कोरली आहे. त्यातील बारकावे इतके सुंदर आहेत की पाहताच मोदीजी खुश झाले. 3 / 5इतकंच नव्हे तर त्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही चेहरा या खडुवर कोरला आहे. त्याच्या या कलेतील परफेक्शन पाहून तो खडु आहे यावर विश्वासच बसत नाही. तसंच विराट आणि अनुष्काच्या मान्यवर मोहेच्या जाहिरातीतील एक फोटोही त्याने कोरला आहे. त्यातही दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अप्रतिम रेखाटले आहेत.4 / 5आता कुठे नाताळ सणाचा फिव्हर आपल्यावरुन उतरतोय. सचिननेही ख्रिसमसच्यानिमित्त सॅन्टाक्लॉज आपल्या कलेतुन प्रगट केला. सोबत साऊथचा सुपरस्टार रजनीकांतही त्याने त्या खडुवर साकारला आहे. त्याच्या अंगात असलेली ही कला त्याला लहानपणापासून अंगीकृत आहे.5 / 5सचिनने आपल्या खडुंमधून योगा करणाऱ्या मानवी आकृत्याही कोरल्या आहेत. त्यातीलही बारकावे थक्क करणारे आहेत. तसंच नरेंद्र मोदी आपल्या मातोश्रींची भेट घेत असतानाचा क्षणही या कलाकाराने कोरला आहे.