भूक लागली म्हणून खाल्लं त्याने बर्गर, थोड्या वेळाने जीभ सुजून आली तोंडाबाहेर..कशी ते वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 16:01 IST
1 / 8बर्गर खाताना त्याला डंश मारला आणि कोबची जीभ सुजून बाहेर आली. यानंतर कोबने व्हिडीओ तयार केला आणि अपलोड केला. हा व्हिडीओ आतापर्यंत ५३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. 2 / 8या मुलाने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो निटपणे बोलूही शकत नाहीये कारण त्याची जीभ पूर्णपणे सूजलेली आहे.3 / 8ही घटना उटाहमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय कोब फ्रीमेनसोबत घडली. त्याने स्वत: बनवलेल्या बर्गरने त्याची अशी स्थिती होईल याची त्याने कल्पनाही केली नसेल. 4 / 8उटाहच्या वेबर स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या कोबला अचानक भूक लागली आणि त्याने बर्गर बनवण्याचा निर्णय घेतला. कोबने मोठ्या आवडीने बर्गर बनवलं.5 / 8बर्गर तयार करून तो काही वेळासाठी बाहेर गेला. परत येऊन त्याने लगेच बर्गर खाणं सुरू केलं. बर्गर संपताच त्याचा तोंडात वेदना होऊ लागली होती. 6 / 8त्याने आरशात तोंड पाहिलं तर हैराण झाला. त्याच्या जीभेवर मधमाशी बसली होती. मधमाशीने त्याला डंश मारला होता. त्यामुळे त्याची जीभ सूजली होती.7 / 8कोबची जीभ इतकी सुजली की, तोंडातून बाहेर आली होती. मधमाशी बर्गरमध्ये जाऊन लपली होती. ज्याकडे कोबचं लक्ष गेलं नाही.8 / 8बर्गर खाताना त्याला डंश मारला आणि कोबची जीभ सुजून बाहेर आली. यानंतर कोबने व्हिडीओ तयार केला आणि अपलोड केला. हा व्हिडीओ आतापर्यंत ५३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.