बापरे! ९ कोटी रुपयांचा चहा, बघा आणखी कोणते आहेत असे अफलातुन महागडे चहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 19:01 IST
1 / 4जगातला सर्वात महागडा चहा आहे चीनमध्ये. da-hong pao tea दा होंग पाओ टी या चहाचे नाव. चीनच्या फुजियान प्रांतात वुई डोंगरात या चहाची शेती होते. याच्या दुर्लभतेचा समावेश राष्ट्रीय खजानानेही केला आहे. याची किंमत प्रतिकिलो १.२ मिलियन डॉलर म्हणजेच ९ कोटी रुपये आहे. याचा इतिहास मिग राजवंश सोबत जोडलेला आहे.2 / 4Panda Dung Tea पांडा डंग टी हा जगातला दुसरा सर्वात महाग चहा आहे. याचे नाव असे का तर पांडा या प्राण्याच्या गोबरचा वापर या चहाच्या शेतीमध्ये केला जातो. या एक किलो चहाची किंमत ७० हजार डॉलर म्हणजेच ५७ लाख रुपये आहे.3 / 4Yellow gold tea buds जगातील तिसरा महाग चहा येल्लो गोल्ड टी बड्स हा आहे. हा एक दुर्लभ चहा आहे. याची पाने सोन्यासारखी चमकतात. शेतीदरम्यान या चहाचे पानं वर्षातून केवळ एकदाच काढले जातात, तेही सोन्याच्या कात्रीने. याची किंमत ७८०० डॉलर म्हणजेच ६ लाख रुपये आहे.4 / 4Silver tips Imperial tea महागड्या चहांमध्ये भारतही मागे नाही. सिल्व्हर टिप्स इंपेरियल टी हा आणखी महाग चहा भारतात दार्जिलिंग मध्ये आहे. याची पानं फक्त पौर्णिमेच्या रात्री तोडली जातात. दार्जिलिंगच्या डोंगरावर मकाइबारी टी इस्टेट मध्ये याची शेती होते. याची दिड लाख रुपये आहे.