व्हाईट हाऊस व्हिला ते प्रायव्हेट आयलॅंडपर्यंत, जगात कुठे-कुठे आहेत विजय माल्याची प्रॉपर्टी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 17:23 IST
1 / 11ब्रिटनच्या एका कोर्टाने सोमवारी उद्योगपती विजय माल्याला दिवाळखोर घोषित केलं. आता भारतीय बॅंका माल्याच्या जगभरातील संपत्ती सहजपणे जप्त करू शकतील. आता त्याच्याकडे हार्यकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्यायही उरलेला नाही. अशात त्याच्या जगभरातील प्रॉपर्टींची चर्चा होत आहे. चला जाणून घेऊ त्याच्या प्रॉपर्टीबाबत...2 / 11विजय माल्याची सर्वात मोठी प्रॉपर्टी 'व्हाइट हाउस द स्काय' आहे. हे पेंटाहाऊस बंगळुरूच्या यूबी सिटीच्या किंगफिशर टॉवरच्य ३२व्या आणि ३३व्या मजल्यावर आहे. टॉवरमध्ये एकूण ८२ अपार्टमेंट आहेत. यातील ७२ इतरांना दिल्या आहेत. १० अपार्टमेंट माल्याने आपल्या परिवारासाठी ठेवल्या आहेत.3 / 11माल्याची दुसरी सर्वात मोठी प्रॉपर्टी फ्रान्सच्या सॉसालितोमध्ये एक आलिशान मेंशन आहे. ही बे ब्रीजच्या किनारी आहे. टायगर वुड्स आणि सेनेना सिस्टर्सचा बंगलाही इथेच आहे. माल्याने १९८४ मध्ये हे मेंशन खरेदी केलं होतं. तेव्हा त्याची किंमत १.२ मिलियन डॉलर होती.4 / 11विजय माल्याने अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्येही एक पेंटहाऊस खरेदी केलं होतं. तेव्हा त्याची किंमत २.४ मिलियन डॉलर होती.5 / 11माल्याचा साउथ आफ्रिकेच्या मेटलटन रोडवर एक शानदार व्हिला आहे. 6 / 11भारतात माल्याचा एक किंगफिशर व्हिला आहे. जो गोव्यात आहे. याची किंमत ७० कोटी रूपये होती. हा २०१७ मध्ये जप्त करण्यात आला.7 / 11फरार विजय माल्या स्कॉटलॅंडमध्येही किल्ल्यांचा आणि लंडनमध्ये काही फार्म हाउसचा मालक आहे. 8 / 11इतकंच नाही तर विजय माल्याने एक पूर्ण आयलॅंड खरेदी केला होता. आइल सेंटमार्गुराइट नावाच्या या आयलॅंडव माल्याचा आलिशान व्हिला आहे. मॉन्टी कार्लोमध्येही माल्याचं एक आयलॅंड आहे.9 / 11माल्याकडे स्वत:चं जेटही होतं. जे सहा महिन्यांपूर्वी लिलावात विकण्यात आलं. अमेरिकेच्या एका कंपनीने ते ३५ कोटीला घेतलं. 10 / 11सोबतच माल्याकडे २५० पेक्षा जास्त लक्झरी आणि व्हिटेंज कार्सचं कलेक्शन आहे. यात फरारी, कॅलिफोर्निया स्पायडर, इनसाइन एमएन०८ यांचा समावेश आहे.11 / 11विजय माल्याकडे एक प्रायव्हेट याटही होतं. याला इंडियन एंप्रेस नाव दिलं होतं. ९५ मीटर लांब या मेगा याटसोबत हेलिपॅडही होतं. २०११ मध्ये ते विकण्यात आलं.