शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२४ साठी बाबा वेंगांची 'ही' भविष्यवाणी खरी ठरली! या वर्षी आणखी एक भविष्यवाणी खरी होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 8:45 PM

1 / 7
बाबा वेंगांच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण जग विश्वास ठेवते. दरवर्षी प्रमाणे, बाबा वेंगा यांनी २०२४ साठी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या जे खूप भयावह होते. आपल्या भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वांगांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.त्यांची २०२४ या वर्षासाठीचे दोन भाकीत खरे ठरले आहेत.
2 / 7
मृत्यूपूर्वी, बाबा वेंगा यांनी जगाचा अंत, युद्ध आणि आपत्ती यासह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यांनी ५०७९ पर्यंत भाकित केले होती. सोव्हिएत युनियनचे विघटन आणि अमेरिकेतील अल कायदा या दहशतवादी संघटनेने ९/११ च्या हल्ल्यांसह बाबा वेंगांचे अनेक भाकीत खरे ठरले.
3 / 7
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार २०२४ मध्ये कर्करोगासह अनेक आजारांवर उपचार मिळू शकतात. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच सांगितले की, रशियन शास्त्रज्ञ कर्करोगाची लस तयार करण्याच्या जवळ आले आहेत.
4 / 7
बाबा वेंगा यांनी असा दावा केला होता की, आर्थिक संकट येईल, त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल. त्यांचा हा अंदाजही खरा ठरताना दिसत आहे. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये मंदी होती, तर जपानमध्ये मंदी दिसून येत आहे. यासोबतच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.
5 / 7
बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, २०२४ मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या होऊ शकते. या कटात इतर कोणी नसून त्यांच्याच देशातील लोकांचा सहभाग असू शकतो.
6 / 7
बाबा वेंगा यांनी दावा केला आहे की, जगातील सर्वात मोठा देश २०२४ मध्ये जैविक शस्त्रांची चाचणी घेऊ शकतो. असे झाले तर ते जगासाठी खरोखरच धोकादायक ठरेल.
7 / 7
बाबा वेंगा यांनी २०२४ मध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा इशाराही दिला आहे. २०२४ मध्ये संपूर्ण जगाला हवामानाशी संबंधित गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल, असा दावाही त्यांनी केला.