जगातील एक असं शहर जिथे असतात फक्त पांढऱ्या रंगाच्या कार, दुसऱ्या रंगाची घेतली तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:39 IST
1 / 7Only white car city : आपण आपल्या आवडीच्या रंगांच्या गाड्या खरेदी करत असतो. हा आपला खाजगी भाग आहे. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल की, जगात एक असंही शहर आहे जिथे केवळ पांढऱ्या रंगाच्या गाड्यांचा वापर केला जातो. महत्वाची बाब म्हणजे गाडी रंग सरकार ठरवतं.2 / 7आज आपण ज्या शहराबद्दल बोलत आहोत, तिथे गाड्यांपासून ते फुटपाथपर्यंत सर्व काही एकाच रंगात रंगलेले आहे आणि तो रंग म्हणजे पांढरा. हा रंगच या शहराची ओळख बनला आहे. आपण बोलत आहोत तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात याबद्दल. जगातील एकमेव असे शहर जिथे सरकार तुमच्या गाडीचा रंगसुद्धा ठरवते. संपूर्ण शहरावर जणू पांढरी चादर!3 / 7अविश्वसनीय वाटेल, पण अश्गाबात शहर पूर्णपणे सफेद मार्बलने झाकले गेले आहे. इमारती, सरकारी ऑफिस, रस्त्यांचे फुटपाथ, पुल सगळं सगळं पांढऱ्या मार्बलचं! म्हणूनच या शहराला जगभरात ‘व्हाइट मार्बल सिटी’ म्हणून ओळखले जाते.4 / 7अश्गाबातमध्ये सर्वाधिक प्रमाणात पांढरं मार्बल वापरण्यात आल्यामुळे या शहराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. 2000 नंतर शहरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करण्यात आला आणि 550 हून अधिक मार्बलच्या इमारती उभारण्यात आल्या. संपूर्ण शहर सूर्यप्रकाश इतका परावर्तित करते की ढगाळ हवा असतानाही लोकांना सनग्लासेस घालावे लागतात.5 / 72018 मध्ये एक अनोखा नियम लागू करण्यात आला. त्या वेळच्या राष्ट्राध्यक्ष गुरबांगुली बर्दीमुखामेदोव यांना पांढरा रंग अत्यंत प्रिय होता. त्यांच्या आदेशाने एक कठोर नियम लागू झाला. शहरात फक्त पांढऱ्या रंगाच्या गाड्यांनाच प्रवेश!6 / 7जर तुम्ही पांढऱ्या रंगाशिवाय इतर कोणत्याही रंगाची कार घेऊन शहरात गेलात तर पोलिस त्वरित गाडी जप्त करतात. कार मालकावर मोठा दंड देखील आकारला जातो. गाडी तेव्हाच सोडली जाते जेव्हा मालक कारचे पेंट बदलून ती पांढरी करून आणतो.7 / 7अश्गाबातमध्ये जाहिराती, सजावट, सरकारी होर्डिंग्ज, सार्वजनिक ठिकाणे सगळंच व्हाइट थीमवर असतं.