एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:46 IST
1 / 10गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात घडला. टेकऑफ घेताच काही मिनिटांतच हे विमान मेघानीनगर भागातील हॉस्टेलच्या इमारतीला धडकले. या धडक इतकी भयंकर होती की विमानाचा स्फोट झाला आणि इमारत हादरली. सगळीकडे आगीचे धूर आणि ढिगारा दिसत होता.2 / 10या भयंकर दुर्घटनेतून केवळ एकमेव व्यक्ती जिवंत वाचला. हा चमत्कारच असल्याचे लोक म्हणत आहेत. रमेश विश्वासकुमार या विमान अपघातातून वाचले. मी कसा वाचलो हेच त्यांना माहिती नसल्याचे रमेश यांनी म्हटलं. मात्र रमेश यांच्या या कहाणीमुळे फ्रेन सेलक नावाच्या एका व्यक्तीची आठवण जगाला पुन्हा झाली. फ्रेन सेलक यांना जगातील सर्वात लकी माणूस म्हटले जाते. 3 / 10फ्रेन सेलक यांची कहाणी एका फिल्मी सिनेमापेक्षा कमी नाही. त्यांच्या आयुष्यात अशा दुर्घटना घडल्यात त्यातून कदाचितच कुणी जिवंत वाचला असेल. परंतु फ्रेन सेलक कुठल्या ना कुठल्या चमत्कारिक प्रकारे मृत्यूला चकवा देत राहिले. जर नशीब एखाद्यावर मेहरबान असेल तर कुठल्याही भयंकर संकटालाही त्याचा जीव घेता येत नाही याचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 4 / 10फ्रेन सेलक यांच्या आयुष्यात पहिला अपघात झाला तो १९५७ साली, जेव्हा ते एका बसमधून प्रवास करत होते. अचानक ही बस एका पुलावरून नदीत कोसळली. सर्व प्रवाशांमध्ये काहीच लोक वाचले. त्यातील एक फ्रेन, या घटनेनंतर एका रेल्वे अपघातातूनही फ्रेन सेलक सुखरुप बचावले होते. 5 / 10एका अपघातात रेल्वेचे डबे रुळावर घसरले आणि थेट नदीत कोसळले. यावेळीही फ्रेन सेलक वाचले. त्यानंतर एका विमान प्रवासावेळीही त्यांना अपघाताला सामोरे जावे लागले. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे दरवाजे उघडला आणि ते हवेतून खाली पडले. परंतु सुदैवाने ते जिथे पडले तिथे गवताच्या चाऱ्याचा ढीग होता. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या अपघातात विमानातील सर्वच प्रवासी मृत पावले. 6 / 10इतकेच नाही तर फ्रेन २ वेळा एका कारच्या स्फोटातून थोडक्यात वाचले. एकदा इंजिनमध्ये स्फोट होऊन कारला आग लागली. परंतु प्रसंगावधान राखून त्यांनी कारबाहेर उडी घेतली. आणखी एकदा त्यांच्या कार इंधनाची टाकी फुटली आणि आगीच्या विळख्यात कार सापडली परंतु फ्रेन यांनाही थोडीही जखम झाली नव्हती. 7 / 10एकदा डोंगराळ भागात कार अनियंत्रित होऊन दरीत कोसळणार होती तितक्यात त्यांनी कारमधून बाहेर उडी घेतली आणि एका झाडाला लटकून स्वत:चा जीव वाचवला. आयुष्यात इतक्या अपघातांना तोंड दिल्यानंतरही फ्रेन सेलक आज जिवंत आहेत. मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या फ्रेन सेलक यांची कहाणी जगात प्रसिद्ध झाली. 8 / 10आज जगात फ्रेन सेलक यांना The Luckiest Unluck Man नावाने ओळखले जाते. क्रोएशिया इथं ते म्युझिर टीचर होते. त्यांनी बऱ्याचदा मृत्यूचा सामना केला आणि प्रत्येकवेळी मृत्यूच्या दाढेतून वाचले. १९२९ साली फ्रेन सेलाक यांचा जन्म झाला. ती कहाणीही कायम आठवणीत राहणारी होती. 9 / 10फ्रेन यांची आई सात महिन्याची गर्भवती असताना मासेमारी करताना बोटीत पडली होती. त्यावेळी प्रचंड वेदना होऊन तिथेच प्रसुती झाली. फ्रेन सेलक यांचा जन्म समुद्रातील एका बोटीत झाला. त्यानंतर हळूहळू त्यांचे जीवन सुरू झाले. प्रत्येक वेळी सेलक ट्रेन, प्लेन, बस अथवा कार अपघातात मरता मरता वाचले. 10 / 10फ्रेन सेलक यांचे २०१६ साली वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अविश्वसनीय कहाणी आजही इंटरनेटवर प्रसिद्ध आहे. प्रत्येकवेळी एखाद्या मोठ्या अपघातानंतर फ्रेन सेलक यांचे नाव चर्चेत येते. त्यांच्या नशिबाची गोष्ट बीबीसी, द गार्जियनसारख्या मोठ्या मिडिया प्लॅटफॉर्मनेही कव्हर केली आहे.