शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

4500 विमाने अन् 40 अंतराळयान..; 'या' ठिकाणी आहे विमानांचे कब्रस्थान, नेमकं काय केलं जातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:37 IST

1 / 7
अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील टक्सन शहराजवळ जगातील सर्वात मोठे एअरक्राफ्ट बोनयार्ड, म्हणजेच विमानाचे 'कब्रस्थान' आहे. अधिकृतरीत्या Davis-Monthan Air Force Base AMARG (Aerospace Maintenance and Regeneration Group) या नावाने ओळखला जाणाऱ्या या परिसरात तब्बल 4,500 हून अधिक जुनी विमाने आणि 40 अंतराळ याने ठेवली आहेत.
2 / 7
कोट्यवधी नव्हे तर अब्जावधी डॉलर किमतीची ही संपत्ती अमेरिकन लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे, हे केवळ कब्रस्थान नसून, जगातील सर्वात मोठे आणि लाभदायक एरोस्पेस री-सायकलिंग व स्टोरेज सेंटर मानले जाते.
3 / 7
अ‍ॅरिझोनाच का निवडलं? या परिसराची निवड वैज्ञानिक कारणांमुळे झाली आहे. अतिशय कोरडे वातावरण : वर्षभर कमी आर्द्रता आणि अल्प पाऊस असल्यामुळे लोखंडी विमाने गंजत नाहीत. सपाट, कठीण जमीन : विस्तीर्ण व सपाट भूमीवर नवीन विमाने थेट उतरवून उभी करता येतात.मोठा लष्करी तळ : सुरक्षा, देखभाल आणि तांत्रिक सोयी उपलब्ध. या अनोख्या वातावरणामुळे येथे ठेवलेली विमाने दशकानुदशके जवळपास अबाधित राहतात.
4 / 7
इथे नेमकं काय केलं जातं? हा परिसर 'कब्रस्थान' म्हणून ओळखला जात असला तरी प्रत्यक्षात तो मोठा एव्हिएशन बिझनेस सेंटर आहे. जुनी विमाने दुरुस्त करून पुन्हा उड्डाणासाठी तयार केली जातात. उपयुक्त पार्ट्स काढून इतर विमानांमध्ये बसवले जातात. काही विमाने अमेरिकेच्या मित्रदेशांना स्वस्तात विकली जातात. फार जुनी व निकामी विमाने स्क्रॅप करून वितळवली जातात.
5 / 7
दरवर्षी सुमारे 400 नवीन विमाने येथे आणली जातात आणि जवळपास तितकीच विकली किंवा वापरली जातात. त्यामुळे येथे खर्च होणाऱ्या प्रत्येक 1 डॉलरमागे जवळपास 11 डॉलरची कमाई होते, अशी माहिती तज्ञ देतात.
6 / 7
AMARG संपूर्णपणे अमेरिकन हवाई दलाच्या नियंत्रणात आहे. सामान्य नागरीकांना येथे प्रवेश नाही. याशिवाय, ड्रोन उड्डाण, अनधिकृत फोटोग्राफीसदेखील सक्त मनाई आहे. या परिसराच्या उपग्रह प्रतिमा देखील मर्यादित उपलब्ध, कारण अमेरिकन सरकार हे क्षेत्र रणनैतिक संपत्ती म्हणून पाहते.
7 / 7
नकाशावर काय दिसते? प्रवेश बंद असला तरी Google Maps वर Davis-Monthan Air Force Base किंवा The Boneyard Tucson सर्च केल्यास हजारोंच्या संख्येने विमाने एका जागी रांगोळीप्रमाणे उभी असल्याचे भव्य दृश्य दिसते. दूरून पाहताना हे दृश्य अगदी एखाद्या मुलाने जमिनीवर आपली खेळणी विखुरली असावीत असे वाटते.
टॅग्स :AmericaअमेरिकाairplaneविमानInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स