1 / 10हे लग्न एका मंदिरात पार पडलं. या लग्नात दोन्ही परिवारातील लोक आणि काही नातेवाईक आले होते. नंतर या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या प्रकरणात एक यूटर्न आला. 2 / 10आधी तर या तरूणाने एकाच मुहूर्तावर एकाच मांडवात दोन बहिणींसोबत लग्न केलं आणि नंतर त्याला पोलीस उचलून घेऊन गेले. जेव्हा सत्य समोर आलं तर सगळेच हैराण झाले.3 / 10आता तुम्हीही विचारात पडले असाल की, असं काय झालं की, पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली. चला जाणून घेऊन या लग्नाबाबत नेमकं काय घडलं.4 / 10या व्यक्तीचं नाव आहे उमापथे. असे सांगितले जात आहे की, त्याने आपल्या समुदायातील ललिथा नावाच्या तरूणीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. ललिथाच्या परिवारात आणि उमापथेच्या परिवारात लग्नाबाबत बोलणी झाली. 5 / 10दोघांनी लग्नासाठी होकार दिला. पण ललिथाने अचानक एक मोठी अट तरूणासमोर ठेवली. ती म्हणाली की, ती लग्न तेव्हाच करेल जेव्हा तरूण माझ्या बहिणीसोबतही लग्न करेल. 6 / 10असे सांगितले जात आहे की ललिथाची बहीण मुकबधीर आहे. त्यामुळे तिने अशाप्रकारची अट ठेवली. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही परिवारात यावरून बोलणी झाली. बराच विचार केल्यावर दोन्ही परिवार या लग्नासाठी तयार झाले. 7 / 10त्यानंतर ठरल्याप्रमाणे एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर दोघीचं लग्न उमापथेसोबत झालं. उमापथेने ७ मे रोजी ललिथा आणि तिची बहीण सुप्रियासोबत लग्न केलं.8 / 10हे लग्न एका मंदिरात पार पडलं. या लग्नात दोन्ही परिवारातील लोक आणि काही नातेवाईक आले होते. नंतर या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या प्रकरणात एक यूटर्न आला. 9 / 10पोलीस या तरूणाला अटक करण्यासाठी पोहोचले. चौकशीतून समोर आलं की एक मुलगी अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. 10 / 10नंतर असं समोर आलं की सुप्रियाच्या वडिलांनी सुद्धा एकाच दिवशी एकाच वेळी दोन बहिणींसोबत लग्न केलं होतं. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा रंगली आहे.