शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगभरातील 'या' अजब एअरलाईन्सने एकदा तरी नक्की प्रवास करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 3:53 PM

1 / 8
विमानाने प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास उत्तम व्हावा यासाठी सर्वच एअरलाईन्स प्रवाशांना अनेक सेवा सुविधा देत असतात. मात्र जगात काही अजब एअरलाईन्स आहेत. या एअरलाईन्स कोणत्या हे जाणून घेऊया...
2 / 8
एका जर्मन ट्रॅव्हल एजन्सीने 2008मध्ये जगातील सर्वात पहिली न्यूड एअरलाईन लाँच केली होती. या न्यूड एअरलाईन्समध्ये प्रवाशांना समर ट्रिपसाठी जर्मनी ते बाल्टिक सागरदरम्यान हवाई सफर केली जाते.
3 / 8
इव्हा एअरलाईनमधील सर्व गोष्टी या हॅलो किटी या थीमवर आधारित आहेत. पॅसेंजर सीट, पाण्याचा ग्लास, नॅपकीन या सर्व गोष्टी हॅलो किटी थीमनूसार आहेत.
4 / 8
केएलएम रॉयल डच या एअरलाईन्सने प्रवाशांसाठी Meet and Seat ही सर्विस लाँच केली आहे. यामध्ये प्रवाशांना त्यांच्यासोबत प्रवास करणारे को-पॅसेंजर फेसबुक प्रोफाईल पाहून निवडता येतात.
5 / 8
ला कम्पॅग्नी एअरलाईन्समध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी एक मसाज खुर्ची, टॅबलेट तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
6 / 8
एअर माल्टा या एअरलाईन्सने जुलै 2015 पासून प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी फ्रि मसाज देण्याची सुविधा सुरू केली आहे.
7 / 8
एअर न्यूझीलँड या फ्लाईटमध्ये न्यूझीलँड ते लॉस एंजेलिस दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांना सीट नाही तर पूर्ण काऊच दिले जाते. त्यामुळेच ते कुटुंबीयांसमवेत झोपून प्रवास करू शकतात.
8 / 8
VietJet या एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस या प्रवाशांना खूश करण्यासाठी बिकिनीमध्ये असतात.
टॅग्स :airplaneविमान