डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:27 IST
1 / 5गेल्या काही दिवसांपासून डॉलरसमोर भारतीय रुपया सातत्याने कमकुवत होत चालला आहे. सध्या एक डॉलरची किंमत सुमारे ९० रुपयांच्या आसपास आहे. भारताची अर्थव्यवस्था भक्कम होत असली तरी डॉलरसमोर रुपया सातत्याने कमकुवत होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र असं असलं तरी डॉलर हे काही जगातील सर्वात शक्तिशाली चलन नाही आहे.2 / 5जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे ते म्हणजे कुवेती दिनार. तेलांचे विपुल साठे, कमी लोकसंख्या आणि भक्कम अर्थव्यवस्थेमुळे कुवेती दिनार हे जगातील सर्वात महागडं चलन बनलेले आहेत. तसेच त्याच्यासमोर अमेरिकन डॉलरसुद्धा टिकत नाही. 3 / 5एक कुवेती दिनारची किंमत भारतीय चलनामध्ये तब्बल २९४.१२ रुपये एवढी आहे. तर एका कुवेती दिनारसाठी ३.२६ डॉलर मोजावे लागतात. 4 / 5जगातील सर्वात महागड्या चलनांचा विचार केला तर कुवेती दिनार पहिल्या क्रमांकावर आहे. तर बहरीन दिनार दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओमानी रियाल तिसऱ्या क्रमांकावर तर जॉर्डनियन दिनार चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रिटिश पौंड पाचव्या क्रमांकावर आहे. जिब्राल्टर पौंड सहाव्या क्रमांकावर तर स्विस फ्रँक सातव्या क्रमांकावर आहे. कॅमेन आयलँड्स डॉलर आठव्या क्रमांकावर तर युरो नवव्या क्रमांकावर आहे. तर जगातील सर्वात महागड्या चलनांच्या यादीत अमेरिकन डॉलर हा दहाव्या क्रमांकावर आहे.5 / 5मात्र असं असलं तरी अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वात सशक्त चलन आहे. त्यामुळे जगातील बहुतांश व्यापार हा डॉलरमध्येच होतो. तसेच जागतिक व्यापारात देवाण घेवाण, तेल आणि सोन्यासारख्या वस्तूंची खरेदी विक्री ही डॉलरमध्येच होते.