शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनी लस ठरली फेल! ज्या देशात सर्वाधिक लसीकरण झालं त्याच देशात पुन्हा कोरोना वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 4:46 PM

1 / 10
अरबी समुद्रातील सेशेल्स (Seychelles) या देशात जगातील इतर देशांपेक्षा सर्वाधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. कारण या देशाची लोकसंख्याच मुळात कमी आहे. पण असं असूनही आता दोन आठवड्यांसाठी देशातील शाळा बंद करण्यात येत आहेत. याशिवाय सर्व क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
2 / 10
सेशेल्समध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सेशेल्समध्ये एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के जनतेला दोन्ही डोस देऊन झाले आहेत.
3 / 10
मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेलं असूनही देशात गेल्या वर्षीसारख्याच लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व आवश्यक पावलं उचलल्यानंतरही देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत जात आहे, असं सेशेल्सचे आरोग्यमंत्री पेगी विदोत यांनी सांगितलं.
4 / 10
सेशेल्समध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. छोट्या-छोट्या बेटांनी तयार झालेल्या या देशाची एकूण लोकसंख्या ९८ हजाराच्या आसपास आहे.
5 / 10
सेशेल्सची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. देशाला संयुक्त अरब अमिरातकडून (यूएई) चीनी कोरोना लस दान म्हणून देण्यात आल्या होत्या. त्याच आधारावर जानेवारी महिन्यात सेशेल्समध्ये लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. याशिवाय, इतरही काही लसींची खरेदी करण्यात आली आहे.
6 / 10
सेशेल्समध्ये १२ एप्रिलपर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये ५९ टक्के वाटा चीनच्या सिनोफार्म लसीचा होता. उर्वरित लसीकरण कोविशील्ड लसीनं झालं आहे.
7 / 10
सेशेल्समध्ये आतापर्यंत 62.2 टक्के जनतेला कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. याच्या तुलनेत इस्राईलमध्ये 55.9 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं आहे. तो सर्वाधिक लसीकरण झालेला देश म्हणून ओळखला जात आहे.
8 / 10
सेशेल्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊन देखील कोरोना वाढीमागची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकांनी कोरोना संबंधीच्या नियमांमध्ये बेजबाबदारपणा दाखवला आहे. ईस्टरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं लोकांनी सेलिब्रेशन केलं.
9 / 10
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 28 एप्रिलपर्यंत सेशेल्समध्ये सक्रीय रुग्ण 612 होते, त्यात वाढ होऊन आता 1068 इतके झाले आहेत.
10 / 10
दरम्यान, सेशेल्समध्ये चीननं तयार केलेल्या लसीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. तरीही कोरोना वाढत असल्यानं तज्ज्ञांनी लसीकरण केल्यानंतरही नागरिकांनी काळजी बाळगण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनCorona vaccineकोरोनाची लस